भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी कोर्टानं फेटाळला चौघांचा जामीन

पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे १ जानेवारी २०१८ रोजी हिंसाचार झाला होता.
there are some reasons behind Koregaon Bhima riots
there are some reasons behind Koregaon Bhima riots

मुंबई : पुण्यातील एल्गार परिषद (Elgar Parishad) आणि भीमा कोरेगाव (Bhima Koregaon) येथे १ जानेवारी २०१८ रोजी हिंसाचार झाला होता. या प्रकरणी अटकेत असलेले आरोपी सागर गोरखे, रमेश गायचोर, ज्योती जगताप आणि दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक हनीबाब या चौघांचा जामीन अर्ज मुंबई सेशन्स कोर्टानं सोमवारी फेटाळला. (Bhima Koregaon violence Mumbai Sessions Court rejects bail of four accused)

there are some reasons behind Koregaon Bhima riots
Video: उड़ ने दो मिट्टी को..; शिक्षणमंत्र्यांनी घेतली योगींची शाळा

चार वर्षांपूर्वी ३१ डिसेंबर २०१७ रोजी पुण्यात एल्गार परिषद झाली होती आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी १ जानेवारी २०१८ रोजी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलेल्या आंबेडकरी जनतेवर समाजकंटकांकडून हल्ला करण्यात आला होता. यावेळी दगडफेक आणि वाहनांची जाळपोळ करुन मोठा हिंसाचार घडवून आणला गेला होता. यामध्ये राहुल फटांगडे या एका तरुणाचा मृत्यू झाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com