esakal | भिवंडी : गरोदर महिला तब्बल दहा तास ताटकळत | pregnant woman
sakal

बोलून बातमी शोधा

pregnant woman

भिवंडी : गरोदर महिला तब्बल दहा तास ताटकळत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

भिवंडी : शहरातील इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात (Hospital) रोहिणी मारुती मुकणे (वय २८, रा. पोगाव, भिवंडी) या आदिवासी महिला (tribal woman) रुग्णाला प्रसूतीसाठी (woman delivery) दाखल करून घेण्याऐवजी तिला दुपारी १ वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत तब्बल दहा तास रुग्णालयाच्या पायरीवर बसवून ठेवण्यात (waiting) आल्याची घटना उघडकीस आली आहे. श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल (patient admitted) केले. तिची प्रकृती स्थिर आहे.

हेही वाचा: मालाडमध्ये इस्टेट एजंटची गळफास घेऊन आत्महत्या; तिघांवर गुन्हा दाखल

भिवंडी तालुक्यातील पोगांव या आदिवासी पाडा येथे राहणाऱ्या रोहिणी मारुती मुकणे यांना काल दुपारी पती मारुती यांनी भिवंडी शहरातील इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले; मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना बाहेरून काही तपासण्या करून या, असे सांगून रुग्णालयाबाहेर दुपारी बसवून ठेवले. ही बाब रात्री ८ वाजता श्रमजीवी संघटनेचे प्रमुख प्रमोद पवार, प्रफुल्ल पवार यांच्या निदर्शनास येताच त्यांनी त्यांनी चौकशी केली असता त्यांना हा प्रकार उघडकीस आला.

त्यामुळे त्यांनी श्रमजीवी संघटनेचे स्थानिक कार्यकर्ते किशोर हुमने, प्रफुल पवार, संदीप वाघे, जगन पारधी, गुरुनाथ मुकणे या कार्यकर्त्यांनी रात्री डॉक्टरांशी चर्चा करून तातडीने महिलेला दाखल करून घेतले. झालेल्या गंभीर प्रकारामुळे संताप व्यक्त केला जात आहे. या कारभाराविरोधात लवकरच आंदोलन करणार असल्याची माहिती श्रमजीवी संघटनेचे प्रमुख प्रमोद पवार यांनी दिली. दरम्यान, या प्रकाराबाबत इंदिरा गांधी रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश मोरे यांच्याशी संपर्क केला असता, संबंधित महिला बाहेर बसली होती. याबाबत मला काही माहिती नाही. झालेला प्रकार गंभीर आहे. मी चौकशी करतो, असे त्यांनी सांगितले.

loading image
go to top