esakal | १६ लाखांचे बार्ज व सक्शन पंप केले नष्ट ; भिवंडी खाडीत रेतीमाफियांवर कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

Sand

१६ लाखांचे बार्ज व सक्शन पंप केले नष्ट ; भिवंडी खाडीत रेतीमाफियांवर कारवाई

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

भिवंडी : भिवंडी (bhivandi) तालुक्याच्या खाडीपात्रात मोठ्या प्रमाणावर रेतीमाफियांकडून (Sand mafia) अनधिकृतपणे रेती उत्खनन (Illegal sand business) केले जात आहे. याविरोधात भिवंडी तहसीलदार अधिक पाटील (Tehsil Adhik Patil) यांनी आपल्या पथकासह विविध ठिकाणी कारवाई करीत सुमारे १६ लाखांचे बार्ज व सक्शन पंप नष्ट केले.

हेही वाचा: पडक्या विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू

तहसीलदार अधिक पाटील व रेती गटाचे तहसीलदार राहुल सारंग यांनी आपल्या विशेष मंडळ अधिकारी तलाठी पथकासह कशेळी काल्हेर ते कोनगाव या खाडीपात्रात बोटीद्वारे गस्त घालीत असताना रेतीउत्खनन करणारे दोन सक्शन पंप व एक बार्ज अंजूर व कोनगाव क्षेत्रात आढळून आली. पथकाची चाहूल लागताच बार्जवरील चार व्यक्तींनी पाण्यात उड्या मारून पलायन केले.

त्या वेळी बार्जवरील व्यक्तींनी बार्जवरील व्हॉल्व्ह उघड केल्याने बार्जमध्ये पाणी साचल्याने पथकाने बार्ज त्याच ठिकाणी पाण्यात बुडविला असून दोन सक्शन पंप काल्हेर येथे आणून ते हायड्रोच्या साह्याने पाण्याबाहेर काढून गॅस कटरच्या सहाय्याने सक्शन पंप नष्ट करण्यात आले आहेत. बार्ज मालकाविरोधात नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक मालोजी शिंदे करीत आहेत.

loading image
go to top