

Bhiwandi building collapse leaves 8 dead
esakal
भिवंडीतील बालाजी नगर-गंगारामवाडी येथील कोहिनूर अपार्टमेंट ही चार मजली इमारत गुरुवारी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला असून, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली एका बालकासह दोन ते तीन जण अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.