Bhiwandi Crime Case
esakal
आरोपी न्यायालयातून पसार होऊन सात वर्षीय मुलीवर अत्याचार व हत्या
पोलिसांच्या निष्काळजीपणावर नागरिकांकडून तीव्र संताप
पीडित कुटुंबीयांची आरोपीला फाशीची मागणी
भिवंडी : येथून अत्याचाराची संतापजनक घटना समोर आली आहे. सहा वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून हत्या केल्याच्या गुन्ह्यात आरोपीस भिवंडी न्यायालयात (Bhiwandi Crime Case) आणले असता, तो पोलिसांच्या तावडीतून पसार झाला. मात्र, काही तासांतच त्याने सात वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे भिवंडी शहर हादरून गेले आहे.