

Bhiwandi Tragedy: Two Sanitation Workers Suffocate to Death Near Municipal Commissioner's Bungalow
eSakal
भिवंडी शहरात नाल्यातील अडथळा दूर करण्यासाठी साफसफाई करताना दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला. गुरुवारी (२६ नोव्हेंबर) दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास भिवंडी निजामपूर महापालिकेच्या आयुक्तांच्या बंगल्याजवळ ही दुर्घटना घडली. दोन्ही कामगार खासगी कंत्राटदारामार्फत सफाईच्या कामासाठी तैनात करण्यात आले होते.