Suresh Mhatre
Suresh Mhatresakal

Bhiwandi Loksabha Election : भिवंडी लोकसभेसाठी राष्ट्रवादीचे सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर

सुरेश म्हात्रे केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना देणार काटे की टक्कर

डोंबिवली - भिवंडी लोकसभेसाठी राष्ट्रवादी आग्रही होती. डिसेंबर महिन्यात सुरेश म्हात्रे यांच्या मुलीच्या लग्न स्वागत समारंभास शरद पवार यांनी उपस्थिती लावली होती. त्यावेळी पवार आणि म्हात्रे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याने लोकसभा निवडणुकीत भिवंडीचे उमेदवार म्हणून म्हात्रे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले होते.

म्हात्रे यांनी देखील महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांना खुले आव्हान करत निवडणुकीच्या रिंगणात आपलाच सामना करायचा असल्याचे पाटलांना वारंवार संकेत देत होते. अखेर म्हात्रे यांची उमेदवारी जाहीर झाली असून भिवंडीत पाटील विरुद्ध म्हात्रे असा सामना आता रंगणार आहे.

भिवंडी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाने सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी देत महायुतीचे कपिल पाटील यांच्या समोर तगडे आव्हान उभे केले आहे. म्हात्रे हे शिवसेना शिंदे गटाचे भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख होते. शिंदे यांना धक्का देत म्हात्रे यांचा पक्ष प्रवेश करत पवारांनी वेगळीच खेळी खेळत हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे खेचून आणला आहे.

सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांच्या मुलीच्या लग्नाच्या स्वागत समारंभा निमित्त डिसेंबर महिन्यात शरद पवार भिवंडीत आले होते. त्यावेळी शरद पवार आणि म्हात्रे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली होती. तसेच राष्ट्रवादीच्या ठाणे येथील जाहीर सभेत जितेंद्र आव्हाड यांनी सुरेश म्हात्रे यांचा उल्लेख आमचा बाळ्या मामा असा करत म्हात्रे राष्ट्रवादी मध्ये जाणार असल्याचे सूतोवाच दिले होते.

बंद दाराआड झालेल्या या चर्चेत भिवंडी लोकसभा निवडणुकीबद्दल चर्चा तसेच राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा हेच असणार असल्याची चर्चा होती त्यावर आज शिक्कामोर्तब राष्ट्रवादी कडून करण्यात आले.

भिवंडी लोकसभा नेहमीच काँग्रेसकडे राहिला आहे. मात्र सध्या भिवंडी लोकसभेत काँग्रेस पक्ष कमजोर असून फुटीर धोरणामुळे काँग्रेसने भिवंडी महापालिका देखील गमावली आहे. तर भिवंडी लोकसभेच्या सहाही विधानसभा मतदार संघात काँग्रेसचे अस्तित्व नाही.

हा मतदारसंघ मुस्लिमबहुल मतदार संघ असल्याने केवळ मुस्लिम मतदारांच्या गणितावर काँग्रेस नेहमी भिवंडी लोकसभा मतदार संघावर आपला दावा करत आली आहे. मात्र 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला भिवंडीतून सतत अपयश येत असल्याने भिवंडी लोकसभेवर राष्ट्रवादीने दावा करत हा मतदारसंघ आपल्याकडे खेचला.

केवळ खेचलाच नाही तर पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान उभे केले आहे. म्हात्रे यांनी उमेदवारी जाहीर होण्या आधीपासूनच पाटील यांना विकास कामावरून शह देण्यास सुरुवात केली होती. आता उमेदवारी जाहीर झाल्यानंतर म्हात्रे कशा पद्धतीने आपली रणनीती आखतात हे आता पहावे लागेल.

जिजाऊ सामाजिक संघटनेचे निलेश सांबरे हे काँग्रेसकडून इच्छुक होते मात्र राष्ट्रवादीने येथे आपला उमेदवार जाहीर केल्याने सांबरे हे आता अपक्ष म्हणून उभे राहतात का हे पहावे लागेल.

भिवंडी लोकसभेचे चित्र काय?

भिवंडी लोकसभेतून भाजपचे कपिल पाटील हे 2014 आणि 2019 असे सलग दोन वेळेस विजयी झाले आहेत. 2019 च्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांनी काँग्रेसचे सुरेश टावरे यांचा एक लाख 56 हजार 329 मतांनी पराभव केला. कपिल पाटील यांना 5 लाख 23 हजार 583 मते मिळाली. तर, काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांना 3 लाख 67 हजार 254 मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीने या ठिकाणी 51 हजार 455 मते घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com