

BJP Changes Mayor Candidate at Last Minute in Bhiwandi
Esakal
भिवंडी महापालिकेच्या महापौर निवडणुकीला अनपेक्षित वळण लागले आहे. निवडणुकीच्या तोंडावरच भाजपने आपला अधिकृत उमेदवार बदलल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. भिवंडी महापालिका महापौरपदाच्या निवडणुकीला वेगळेच वळण मिळाले असून, निवडणुकीच्या तोंडावरच भाजपने आपला उमेदवार बदलला आहे. भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शहराध्यक्ष रवी सावंत यांना पत्र देऊन नारायण चौधरी यांना भाजपचे महापौर पदाचा अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केले होते.