

Bhiwandi Municipal Corporation
ESakal
भिवंडी : भिवंडी निजामपूर शहर महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सत्तेचे समीकरण गुंतागुंतीचे झाले आहे. या निवडणुकीत पहिल्यांदाच १२ जागा जिंकणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची भूमिका अत्यंत निर्णायक ठरणार असून, त्यांच्या पाठिंब्याशिवाय महापौर बसवणे कोणत्याही गटाला शक्य नसल्याचे चित्र दिसत आहे.