भिवंडी रोड स्थानकातून १३ लाख पॅकेजेस पार्सल; ऑनलाईन शॉपिंगला चालना

railway goods services
railway goods servicessakal media

मुंबई : भिवंडी (bhiwandi) रोड परिसरात ऑनलाईन शाॅपिंग (online shopping) वेबसाईटचे मोठ्या प्रमाणात गोदामाचे (warehouse) जाळे पसरलेले आहे. त्यामुळे देशभरातील सामग्री (goods) रेल्वेने भिंवडी रोड येथून येते आणि येथूनच देशभरात रेल्वेने (railway transport) पाठविली जाते. स्वस्तात आणि वेगवान वाहतूकीमुळे या ऑनलाईन शॉपिंगला वेबसाईटला खूप लाभ होतो. यासह दिवसेंदिवस भिंवडी रो़ड येथून पार्सल वाहतूकीत (parcel material) वाढ होत आहे. मागील दहा महिन्यात तब्बल 18 हजार 867 टन वजनाचे एकूण 13.37 लाख पॅकेजेस पाठविण्यात आले आहेत.

railway goods services
राज ठाकरेंचा राष्ट्रवादीवर पुन्हा ‘ट्विट’ वार

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील भिवंडी रोड स्थानकात सर्वात यशस्वी बिझनेस डेव्हलपमेंट युनिट सुरू केले आहे. त्यामुळे 10 सप्टेंबर 2020 रोजी पहिल्या पार्सल ट्रेनचे 3 हजार 879 पॅकेजेसमध्ये 86.85 टन पार्सल पाठवले. त्यानंतर सप्टेंबर 2020 ते जुलै 2021 या कालावधीत शालीमार, आजरा (गुवाहाटी), पाटणा आणि इतर ठिकाणी 18 हजार 867 टन पार्सल पाठवण्यात आले आहेत. ज्यात फर्निचर, रेफ्रिजरेटर, इलेक्ट्रॉनिक वस्तू, खाद्यपदार्थ, खाद्यान्न, औषधे, प्लास्टिकच्या वस्तू, पिशव्या, स्टेशनरी, वंगण लोकप्रिय ब्रँडचे तेल आणि सौंदर्यप्रसाधने यांचा समावेश आहे.

भिवंडी रोड येथून सर्वात जास्त शालीमार येथे 8 हजार 730.68 टन पार्सल पाठविण्यात आले आहेत. त्यानंतर 8 हजार 72.46 टन पार्सल आजरा (गुवाहाटी) आणि 1 हजार 635 टन पार्सल दानापून (पाटणा) यातून मध्य रेल्वेला 10.80 कोटींचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. क्षेत्रीय आणि विभागीय स्तरावर रेल्वेने स्थापन केलेल्या बिझनेस डेव्हलपमेंट युनिट (बीडीयू) चा एक भाग म्हणून, मध्य रेल्वेने उद्योगांना अखंड आणि परवडणारी कनेक्टिव्हिटी प्रदान करून मालवाहतूक आणि पार्सल लोडिंगला चालना देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

railway goods services
गिरणी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मुख्यमंत्री अनुकूल!

भिवंडी रोड स्थानक मुंबई आणि ठाणे शहरांना जवळ आहे. उत्तर-दक्षिण आणि जेएनपीटी बंदरासाठी रेल्वेने उत्तम जोडणी आहे. यासह सुयोग्य गोदाम आणि ई-कॉमर्स सुविधा तसेच ट्रक आणि टेम्पोसाठी पुरेशी पार्किंगची जागा असल्याने पार्सल वाहतूक करण्यास फायदेशीर आहे. भिवंडीच्या विकासासाठी मध्य रेल्वेच्या प्रयत्नांमुळे भिवंडीचा चेहरामोहरा एका स्थानकापासून ते एका महत्त्वाच्या व्यावसायिक केंद्रामध्ये बदलला आहे, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com