गिरणी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मुख्यमंत्री अनुकूल!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गिरणी कामगारांचा जिव्हाळ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी अनुकूलता दर्शविली
mumbai
mumbaisakal
Updated on

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी गिरणी कामगारांचा (mill workers) जिव्हाळ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी अनुकूलता दर्शविली आहे, अशी माहिती राष्ट्रीय मिल मजदूर (National Mill Workers) संघाचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी दिली.

अहिर यांनी शुक्रवारी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन गिरणी कामगारांच्या तातडीच्या प्रश्नावर चर्चा केली. राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे खजिनदार निवृत्ती देसाई या वेळी उपस्थित होते. गिरणी कामगार हक्काच्या घरांचा प्रश्न समूळ सुटण्यास कालापव्यय होत आहे, तेव्हा या प्रश्नी मुख्यमंत्र्यांनी त्वरित गिरणी कामगार कृती संघटना नेत्यांची म्हाडा आणि संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बैठक बोलवावी आणि हा रखडत चाललेला प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी अहिर यांनी केली. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांना गिरणी कामगार कृती संघटनेने निवेदन दिले.

mumbai
कडक लॉकडाऊनमुळे मजूर, कामगार परतीला; 'सचखंड एक्स्प्रेस'ला तुडूंब गर्दी

लॉकडाऊनमुळे गिरण्यांतील कामगार आणि त्यांच्यावर अवलंबून सुमारे दहा हजार लोक उपासमारीचे जीवन जगात आहेत. याप्रश्नी मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दाखवली आहे. मुंबईतील खासगी तसेच एनटीसी गिरण्यांच्या जुन्या आणि धोकादायक चाळींच्या

पुनर्वसनाची योजना कार्यान्वित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी अहिर यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com