esakal | भिवंडीत वेश्या व्यवसाय करणाऱ्या बांगलादेशी महिलेची हत्या
sakal

बोलून बातमी शोधा

भिवंडीत वेश्या व्यवसाय करणाऱ्या बांगलादेशी महिलेची हत्या

भिवंडीमध्ये अश्याप्रकारे देह व्यापार करणाऱ्या महिलेची हत्या होण्याची ही दुसरी घटना आहे. या आधी २०१९ मध्ये म्हणजेच मागील वर्षी अशाच प्रकारे हत्या करण्यात आलेली.  

भिवंडीत वेश्या व्यवसाय करणाऱ्या बांगलादेशी महिलेची हत्या

sakal_logo
By
सुमित बागुल

भिवंडी : ठाण्याला लागून असलेलं भिवंडी शहर तिथं कायम घडणाऱ्या विविध गुन्हांमुळे कुप्रसिद्ध आहे. नुकतीच भिवंडीत एक भयंकर घटना घडलीये. भिवंडीत राहणाऱ्या आणि वेश्या व्यवसाय करणाऱ्या मुलीचा गळा आवळून खून करण्यात आलाय. सदर घटना भिवंडीमधील हनुमान टेकडी परिसरातील आहे. सदर हत्या झालेली तरुणी केवळ पंचवीस वर्षीय असल्याची माहितीही आता समोर येतेय. ही तरुणी सबीबी रोड हनुमान टेकडी भागात राहत होती.

वर्षभरातील दुसरी घटना : 

भिवंडीमध्ये अश्याप्रकारे देह व्यापार करणाऱ्या महिलेची हत्या होण्याची ही दुसरी घटना आहे. या आधी २०१९ मध्ये म्हणजेच मागील वर्षी अशाच प्रकारे हत्या करण्यात आलेली.  

महत्त्वाची बातमी : भाजपच्या आशिष शेलारांकडून उद्धव ठाकरेंच्या सुपुत्राच्या पाठीवर कौतुकाची थाप; म्हणालेत, "काम महाराष्ट्राची मान उंचावणारे आहे! ग्रेट!"

खून झालेली महिला वेश्या व्यवसाय करत होती. गुरुवारी रात्री तिच्याकडे तीन ग्राहक आले होते अशी माहिती आहे. या परिसरातील नागरिकांनाही त्या ग्राहकांवर संशय असल्याचं समजतंय. देहव्यापार करणाऱ्या पंचवीस वर्षीय तरुणीची गळा दाबून हत्या करण्यात आलीये आणि तिच्या गुप्तांगांना देखील इजा पोहचवण्यात आलीये. या भीषण कृत्यानंतर भिवंडी शहर पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्ह्याची नोंद केली असून सध्या या प्रकरणात तपास सुरु आहे. 

समोर येणाऱ्या माहितीनुसार हत्या झालेली तरुणी ही बांगलादेशी तरुणी असल्याचं कळतंय. या तरुणीची खोली रस्त्याच्या सर्वात शेवटी आणि कोपऱ्यात होती. दरम्यान सदर घटनेमुळे परिसरात घबराहट आहे. 

bhiwandi reports assassination of young twentyfive years bangladeshi girl