भिवंडी वाहतूक पोलिस अॅक्शन मोडमध्ये, ३७३ चालकांवर कारवाई

शरद भसाळे
Sunday, 3 January 2021

भिवंडीत वाहन चालकांची तपासणी करत तब्बल 373 मद्यपी आणि इतर वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे.

मुंबईः भिवंडी शहर परिसरात मोठ्या प्रमाणात मद्य प्राशन करून कर्कश हॉर्न
वाजवत रात्रीच्या वेळी भरधावपणे मोटरसायकलस्वार फिरत असतात. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांना त्रास होत आहे. यातून अपघाताचे प्रमाणही वाढलं आहे.  त्यामुळे पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली होती. नागरिकांनी ठाणे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे ही मागणी केली होती. त्यानंतर नागरिकांच्या मागणीनंतर आयुक्तांनी कारवाई करण्याचे आदेश दिले होते. 

भिवंडी वाहतूक पोलिस शाखा अधिकाऱ्यांना आदेश देताच पोलिसांनी गेल्या दोन दिवसात रात्रीच्या वेळी मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्या मोटारसायकलस्वारांना पकडून कारवाई केली आहे.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

कल्याण नाका, नारपोली आणि कोनगाव या तीन वाहतूक शाखांमधील पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. या नाकाबंदीतून वाहन चालकांची तपासणी करत तब्बल 373 मद्यपी आणि इतर वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा- कोविड पोस्ट ओपीडीकडे रुग्णांची पाठ, केवळ हजार रुग्णांची हजेरी

शहरातील कोनगाव वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक थोरात आणि सहकारी यांनी 98 वाहन चालकावर कारवाई केली.  कल्याण रोड वाहतूक शाखेने 83 मद्यपी वाहन चालकांवर आणि नारपोली वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कल्याणजी घेटें आणि सहकारी यांनी 192 वाहन चालकांवर कारवाई केली. यावेळी कारवाई केलेल्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. विशेष म्हणजे ठाणे पोलिस आयुक्तालय क्षेत्रातील भिवंडीत सर्वाधिक कारवाई झाली आहे.

-----------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Bhiwandi traffic police action mode action taken against 373 drivers


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhiwandi traffic police action mode action taken against 373 drivers