कोविड पोस्ट ओपीडीकडे रुग्णांची पाठ, केवळ हजार रुग्णांची हजेरी

कोविड पोस्ट ओपीडीकडे रुग्णांची पाठ, केवळ हजार रुग्णांची हजेरी

मुंबई: कोरोना संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांच्या आरोग्य तपासणीसाठी पोस्ट कोविड ओपीडी सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र पोस्ट ओपीडीला आतापर्यंत केवळ दीड हजार रुग्णांनी हजेरी लावली आहे. पोस्ट कोविड ओपीडी कोरोना रुग्णांसाठी अत्यावश्यक असून देखील रुग्णांनी त्याकडे पाठ फिरवल्याचे दिसते. 

पोस्ट कोविड रुग्णांना आरोग्याविषयी वेगवेगळ्या समस्या जाणवू लागल्या आहेत. उच्च क्षमतेच्या उपचार पद्धतीमुळं हृदय विकार, मूत्रपिंडाचे विकार, मधूमेह, उच्च रक्तदाब, पित्ताचा त्रास, झोप न लागणं, दम लागणं, स्मरणशक्ती कमकुवत होणं, मानसिक विकार असे त्रास बहुतांश रुग्णांना जाणवू लागले आहेत. त्यांच्या निराकरणासाठी राज्याच्या टास्क फोर्सने पोस्ट कोविड ओपीडी सुरू करण्याचे निर्देशित केले होते. पालिकेने ठिकठिकाणी पोस्ट कोविड ओपीडी सुरू केल्या.

कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांसाठी महापालिकेच्या सर्व प्रमुख रुग्णालयांमध्ये पोस्ट कोविड ओपीडी  सुरू करण्यात आली आहे. पालिकेच्या रुग्णालयांत कोरोनावर उपचार घेऊन डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांना मुंबईतील 24 प्रशासकीय विभाग कार्यालयांत स्थापन वॉर रूमद्वारे संपर्क साधला जातो. या केंद्रांत वरिष्ठ आणि कनिष्ठ डॉक्टर रुग्णांची विचारपूस आणि तपासणी करतात. आतापर्यंत दीड हजारांहून अधिक रुग्णांनी या ओपीडीमध्ये हजेरी लावली असल्याचं समजतं.

महापालिकेच्या रुग्णालयातून उपचार घेऊन घरी गेलेल्या रुग्णांना विभाग कार्यालयातील वॉर रुमद्वारे संपर्क साधला जातो. कोरोनामुक्त झाल्यानंतरही आरोग्याची तक्रार असलेल्या नागरिकांना नजीकच्या पोस्ट कोविड ओपीडीमध्ये बोलाविण्यात येतं. काही रुग्णांना लाँग कोविडचा त्रास संभवतो. अशा रुग्णांना निरीक्षणाखाली ठेऊन उपचार केला जातो. मानसिक ताण कमी करण्यासाठी मार्गदर्शन केलं जातं.

पोस्ट कोविड रुग्णांमध्ये आरोगविषयक गुंतागुंत होत असल्याने काळजी घेण्याचं आवाहन राज्य टास्क फोर्स चे प्रमुख डॉ संजय ओक यांनी केले आहे. लक्षणे नसलेले रुग्ण तसेच सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना भविष्यात आरोग्याच्या समस्या उद्भवण्याचा धोका अधिक असल्याचा इशारा ही त्यांनी दिला. आरोग्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक आहे पोस्ट कोविड रुग्णांनी किमान महिन्यातून एकदा आपल्या आरोग्याची तपासणी करणे महत्वाचे असल्याचे डॉ ओक यांनी सांगितले.

पोस्ट कोविड रुग्णांना केसांपासून ते नखांपर्यंत आरोग्याच्या समस्या जाणवू लागल्या आहेत. कोविडपेक्षा पोस्ट कोव्हिड समस्या अधिक घातक आहेत. त्याकडे दुर्लक्ष करणे जीवावर बेतू शकते.
डॉ संजय ओक, प्रमुख, राज्य कोविड टास्क फोर्स

मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 2 लाख 94 हजार 659 झाली आहे. तर आतापर्यंत 2 लाख 74 हजार 767 रूग्ण बरे होऊन घरी गेले.  एकूण मृतांचा आकडा 11 हजार 132 इतका झाला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर हा 93 टक्के इतका आहे. मुंबईत रुग्ण दुपटीचा दर 361 दिवसांवर गेला आहे.  1 जानेवारी पर्यंत एकूण 23 लाख 82 हजार 420 कोविड चाचण्या करण्यात आल्या. कोविड रुग्णवाढीचा दर 0.21 इतका आहे.

-------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Post covid OPD one thousand patients attended

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com