या कठिण काळातही वैद्यकिय कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर हा अवलीया हसू फुुलवतोय

या कठिण काळातही वैद्यकिय कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर हा अवलीया हसू फुुलवतोय
Updated on

मुंबई: महिनाभरा पासून प्रचंड तणाव 16/18 तासांची ड्यूटी! त्यातही रुग्णालयातून परत कधी बोलावणं येईल याचा नेम नाही. या गंभीर परिस्थितीमुळे डॉक्टर परिचारीकांच्या चेहऱ्यावरचं हसूच नामशेष झालंय. प्रचंड तणावाखाली काम करणाऱ्या वैद्यकिय कर्मचाऱ्यांना त्यांचे हसू परत मिळवून देण्याची जबाबदारी एका जादूगर आणि मेटालिस्टने स्विकारली असून त्यांचा पहिला प्रयोगही यशस्वी झाला आहे. डॉक्टरांसह सर्वच वैद्यकिय कर्मचाऱ्यांचा ताण कमी करण्यात महापालिकेला यश आले आहे.

भुपेश दवे असे या अवलियाचे नाव आहे. महानगर पालिकेच्या जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर रुग्णालयात त्यांनी पहिला प्रयोग यशस्वी केला. महिनाभरापासून सतत कोरोनावर उपचार करणारे वैद्यकिय कर्मचारी प्रचंड तणावाखाली आहेत. सतत औषधे उपकरणे त्यातच घरच्या बरोबर राहताना पाळाव्या लागणाऱ्या मर्यादा यामुळे हा तणाव अधिकच वाढत आहे. हा तणाव कमी करण्यासाठी दवे यांनी पुढाकार घेतला .महापालिकेचे अतिरीक्तआयुक्त सुरेश काकानी यांची परवानगी घेऊन त्यांनी शनिवारी पहिला प्रयोग केला. हलक्या फुलक्या वातावरणात झालेल्या या जादूच्या प्रयोगांना वैद्यकिय कर्मचाऱ्यांनीही मनमुराद दाद दिली.

परिचारीकांच्या हातात छोटे रंगित चेंडू देऊन त्याचा रंग अचुक ओळखणे, एखाद्या पुस्तकातील कोणत्या पानावरीर कोणता शब्द डॉक्टरच्या लक्षात आहे हे ओळखणे असे अनेक हलके फुलके प्रयोग करण्यात आले. महिनाभरा पासून बैठका, ट्रेनिंग नाही तर फक्त 'लेक्चर' ऐकण्यासाठी जमणाऱ्या वैद्यकिय कर्मचारीही या प्रयोगामुळे मनमुराद हसले.महिन्या भरापासून फक्त रुग्ण पळापळ असे चक्र सतत फिरत आहे. आज मिटींग हॉल मध्ये जमायला सांगितल्यावर असचं काहीतरी असेल असं वाटलं होतं.पण हे वेगळचं होतं.महिनाभराने आम्ही मनमुराद हसलो अशी प्रतिक्रीया वैद्यकिय कर्मचारी देत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com