

North-Bound Trains Get Green Signal, Mumbai-Konkan Route Faces Delay
esakal
-नितीन बिनेकर
मुंबई: राज्यातील मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या विलंबाचा प्रश्न कायम असतानाच मध्य रेल्वेकडून उत्तर भारतातील विशेष गाड्यांना नियमित करण्याचा निर्णय वेगाने घेतला जात आहे. दादर-गोरखपूरनंतर आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते रिवा एक्स्प्रेसलाही नियमित दर्जा देण्यात आला आहे. मात्र, कोकणातील प्रवाशांसाठी महत्त्वाची दादर-रत्नागिरी गाडी अजूनही प्रलंबितच आहे. त्यामुळे मुंबईतील खासदारांची ‘दिल्ली’ चालत नाही का, असा सवाल उपस्थित होत आहे.