रायगड जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्राला मोठा फटका; उत्पादन क्षमतेत झालीये इतकी घट?

सुनिल पाटकर
Monday, 10 August 2020

औद्योगिक क्षेत्रात कोरोनाच्या शिरकावामुळे रायगड जिल्ह्यातील उद्योग आजारी पडू लागले आहेत. उद्योगांना येणाऱ्या अनेक अडचणींमुळे त्यांची उत्पादनक्षमता 30 ते 40 टक्के कमी झाल्याने याचा मोठा फटका औद्योगिक क्षेत्राला बसला आहे. 

महाड : औद्योगिक क्षेत्रात कोरोनाच्या शिरकावामुळे रायगड जिल्ह्यातील उद्योग आजारी पडू लागले आहेत. उद्योगांना येणाऱ्या अनेक अडचणींमुळे त्यांची उत्पादनक्षमता 30 ते 40 टक्के कमी झाल्याने याचा मोठा फटका औद्योगिक क्षेत्राला बसला आहे. 

ही बातमी वाचली का? तब्बल एक हजार कोटींचा अवैध माल; नाव्हा शेव्हाच्या इतिहासातील सर्वात मोठी कारवाई, कसं डोकं वापरलेलं वाचा...

रायगड जिल्हा हा औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात एकूण 3147 लघु, मध्यम, मोठे उद्योग असून यात जवळपास 97 हजार 830 कामगार काम करतात. रायगडमध्ये प्रामुख्याने पाताळगंगा, रोहा, महाड, विळेभागाड, रसायनी, नागोठणे, उसर या भागांत औद्योगिक क्षेत्र विस्तारलेली आहेत. रिलायन्स, जेएसडब्ल्यू सुप्रीम पेट्रो, जॉन्सन, ओएनजीसी, जिंदाल, पास्को यांसारख्या मोठ्या उद्योगांसह अनेक रासायनिक, औषध निर्माण, मॅकेनिकल उद्योग येथे कार्यरत आहेत. परंतु, थेट कंपन्यांतील कामगार व कर्मचाऱ्यांनाच कोरोनाची लागण सुरू झाल्याने याचा परिणाम जिल्ह्यातील कारखानदारीवर झाला आहे. महाडमधील सिक्वेट कंपनीत एकाच वेळी तब्बल 35 कामगारांना कोरोनाची लागण झाल्याने ही कंपनी बंद केली होती. 

ही बातमी वाचली का? भाऊ, ताई, मुंबईत कोरोना संपला का ? मग असं का बरं वागताय?

उत्पादन क्षमता 30-40 टक्क्यांनी घटली
जागतिक महामारीमुळे आयात, निर्यातीवर परिणाम, कच्च्या मालाची कमतरता, पडून राहिलेला तयार माल याचा मोठा परिणाम या क्षेत्रावर झाला. कंपन्यांवर अवलंबून असलेले सेवा व्यवसायही मंदावले. कोरानामुळे कारखान्यांची उत्पादन क्षमता 30-40 टक्के कमी झाली. कमी कामगार, कमी माल यातच उत्पादन सुरू ठेवावे लागत आहे. कामगार कमी करणे, सुविधा कमी करणे शक्‍य नसल्याने मोठे नुकसान उद्योगक्षेत्राला सहन करावे लागत आहे. 

ही बातमी वाचली का? ‘हनी-ट्रॅप’मुळे सराईत आरोपी अडकला पोलिसांच्या जाळ्यात  

कोरोनाचा शिरकाव काही कारखान्यांना झाला आहे. उद्योगांचा संबंध जागतिक स्तरावर येत असल्याने अनेक कारखाने कमी उत्पादनावर सुरू आहेत. त्यामुळे कारखान्यांचे नुकसान होत आहे 
- विनोद देशमुख, मुख्य व्यवस्थापक, प्रिव्ही ऑरगॅनिक.

--------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Big blow to industrial sector in Raigad district; Production capacity decreased by 30-40 per cent