
मुंबई : कोरोनामुळे हिंदी चित्रपटसृष्टीतील बिग बजेट चित्रपटांचे टाईमटेबल कोलमडले आहे. काही प्रॉडक्शन हाऊसनी आपल्या चित्रपटांच्या तारखा पुढे ढकलल्या; मात्र चित्रपटगृह कधी सुरू होणार हे अजूनही निश्चित नाही. त्यामुळे या चित्रपटांच्या प्रदर्शनाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हिंदी चित्रपट जगभरातील विविध देशांत प्रदर्शित होतात. तेथील परिस्थितीही पूर्वपदावर येण्यास बराच कालावधी लागणार आहे. त्यामुळे तेथील टाईमटेबलही विस्कळीत झाले आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीतील बिग बजेट चित्रपटांच्या प्रदर्शनाची तारीख अगोदरच ठरविली जाते. त्याप्रमाणे चित्रीकरण उरकले जाते आणि अन्य तांत्रिक सोपस्कार करून चित्रपट प्रदर्शित केले जातात. यावर्षी मार्च ते डिसेंबर महिन्यापर्यंत 'सूर्यवंशी', 'राधे', '८३', 'धाकड', 'लक्ष्मीबॉम्ब', 'बंटी और बबली २', 'भुलभुलैय्या २', 'पृथ्वीराज', 'लालसिंग चढ्ढा' आदी चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा ठरलेल्या होत्या. चित्रपटाचे प्रमोशन कोणत्या तारखेपासून करायचे, टीझर किंवा ट्रेलर कधी लाँच करायचा, आदी गोष्टींबाबत स्पष्टता होती; मात्र आता कोरोनामुळे लॉकडाऊनचा कालावधी वाढला आहे. लाॅकडाऊन पुढे किती वाढेल हे कुणीही सांगू शकत नाही. त्यामुळे या चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तसेच या चित्रपटांच्या परदेशातील प्रदर्शनाबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जगभरात कोरोनाने धुमाकुळ घातला असल्यामुळे सगळीच चित्रपट व्यवसायाचे सगळे गणित विस्कळीत झाले आहे.
सरकारच्या निर्णयाकडे लक्ष
कोरोनाचा फटका बसत असतानाच पावसाळा तोंडावर आल्यामुळे काही चित्रपटांचे सेट्स तोडावे लागणार आहेत; तर काही चित्रपटांच्या चित्रीकरणाचे शेड्युल्ड बिघडले आहे. कमी बजेट चित्रपट आता पूर्ण होतील की नाही याची खात्री नाही. परदेशातील व्यवसायावर परिणाम झालाच; मात्र देशातील व्यवसायावरही खूप मोठा परिणाम झाला आहे. चित्रपटसृष्टीला या सगळ्या गोष्टींतून सावरण्यासाठी मोठा कालावधी लागणार आहे. सर्व सुरळीत झाल्यावरही प्रेक्षक चित्रपटगृहात लवकर येणार नाहीत. त्यामुळे सरकार चित्रपटगृहांबाबत नेमका काय निर्णय घेणार किंवा कधी सुरू करणार, याकडे चित्रपटसृष्टीचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.