पाणी टंचाईचं मोठं संकट, पण ग्रामस्थांना विंधन विहिरी ठरणार आधार

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 26 April 2020

कर्जत तालुक्यातील अनेक भागात पाणी टंचाईला सामारे जावे लागत आहे. त्यामुळे टंचाई ग्रस्त गावे आणि वाड्यांना  दिलासा देण्यासाठी प्रशासनाने 19 ठिकाणी विंधन विहिरी खोदण्यास परवानगी दिली आहे.

नेरळ : कर्जत तालुक्यातील अनेक भागात पाणी टंचाईला सामारे जावे लागत आहे. त्यामुळे टंचाई ग्रस्त गावे आणि वाड्यांना  दिलासा देण्यासाठी प्रशासनाने 19 ठिकाणी विंधन विहिरी खोदण्यास परवानगी दिली आहे. परिणामी ग्रामस्थांना दुष्काळात विहिरींचा आधार मिळणार आहे. 

नक्की वाचा :  उद्धव ठाकरेंना आला राज्यपालांचा फोन ; म्हणाले 'इथे भेटल्यावर ठरवू या वेळ'... 

पाणी टंचाईवर उपाययोजना म्हणून कर्जत तालुका पाणीटंचाई कृती समितीने 13 लाखांची तरतूद केली आहे. यावर्षी तालुक्यातील पाणीटंचाई असलेली 4 गावे आणि 15 आदिवासी वाड्यांमध्ये विंधन विहिरी खोदण्याचे काम केले जाणार आहे. त्यासाठी कृती समितीने 75 हजार रुपये एक याप्रमाणे 13 लाख रुपयांची तरतूद करून ठेवली आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी 19 ठिकाणी विंधन विहिरी खोदण्याचे काम करण्यात येणार असून त्या कालावधीत विंधन विहिरी खोदल्या गेल्या नाहीत तर मंजूर असलेल्या विंधन विहिरीचा निधी सरकारकडे परत जाणार आहे.

हे ही वाचाKEM रुग्णालयात मृतदेह व्यवस्थापन प्रशिक्षण; कोरोनाबाधेच्या धोक्यामुळे उपक्रम

यावर्षीच्या पाणीटंचाई कृती आराखड्यात बोंडशेत, बलीवरे, गौळवाडी आणि उंबरखांड या चार गावात विंधन विहिर खोदण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तसेच फणसवाडी-पिंगळस, फोंडेवाडी, वाघिणीवाडी, तेलंग वाडी, ओलमण कातकरीवाडी, ओलमण चिंचवाडी, कशेळे बेलदारवाडी, पादिरवाडी, भागूचीवाडी, चाफेवाडी, देऊळ वाडी, झुगरेवाडी, किरवली, संजय नगर, खांडपे कातकरीवाडी, मोठे वेणगाव कातकरी वाडी आदी 15 वाड्यात विंधन विहिरी खोदण्यास परवानगी दिली आहे. 

मोठी बातमी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाला सुरुवात

दुरूस्तीच्या कामांनाही मंजूरी 
कर्जत तालुक्यात विहिरी खोल करण्याच्या कामांनाही मंजूरी देण्यात आली आहे. त्यात बोंडेशेत या गावातील विहीर दुरुस्त करण्याचे काम मंजूर असून भडवळ टाकाचीवाडी, भडवळ कातकरीवाडी, वाघिणीवाडी, बेडीसगाव पायथा, भोपळेवाडी आणि पळसदरी येथील दुरुस्ती केली जाणार आहे.

 

Big crisis of water scarcity, but the villagers will be the basis of bore wells

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Big crisis of water scarcity, but the villagers will be the basis of bore wells