लॉकडाऊनबद्दल होणार मोठा निर्णय, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांसाठी सर्वात मोठी बातमी...  

सकाळ वृत्तसेवा
Monday, 1 June 2020

केंद्र आणि राज्य सरकारने जूनच्या पहिल्या आठवड्या पासून लॉकडाऊनमध्ये  शिथीलता आणण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : केंद्र आणि राज्य सरकारने जूनच्या पहिल्या आठवड्या पासून लॉकडाऊनमध्ये  शिथीलता आणण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र,मुंबईची परीस्थीती इकडे आड तिकडे विहीर अशीच आहे. त्यामुळे मुंबईच्या लॉकडाऊन बद्दल आज रात्री पर्यंत निर्णय होणार आहे.

राज्य सरकारने टप्प्या टप्प्याने लॉक डाऊनमध्ये शिथीलता देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारी कार्यालये कमी कर्मचार्यांमध्ये चालवण्याची परवानगी दिली आहे, त्याच बरोबर काही अटींसह दुकाने सुरु करण्याचीही परवानगी दिली आहे. मात्र, असे असले तरी मुंबईतील परीस्थीती पाहता काही भागात स्वतंत्र नियम तयार करावे लागणार आहेत.

मोठी बातमी आदित्य ठाकरेंनी करुन दाखवलं, कोरोनाचा 'हा' हॉटस्पॉट कोरोनामुक्तीच्या दिशेनं 

मुंबईत 700 च्या आसपास प्रतिबंधित क्षेत्र आहेत.तसेच त्यांच्या बाजूचा बफर झोन आहे. या परीसरातील व्यवहार कसे सुरु करायचे याबाबत आज संध्याकाळी मुंबई पालिकेच्या बड्या अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. 'संध्याकाळी होणाऱ्या बैठकित लॉकडाऊनची रुपरेषा ठरविण्यात येईल" असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.

मुंबईतील 24 प्रशासकीय प्रभागांपैकी 6 प्रभागात 2 हजार पेक्षा जास्त कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहेे. तर 8 प्रभागात 1 हजार पेक्षा जास्त रुग्ण आहेत. खासकरुन झोपडपट्ट्यांमध्ये रुग्ण जास्त असल्याने तेथे शिथीलता देण्याबाबत पालिकेत संभ्रमाचे वातावरण आहे. याा सर्वांचा विचार करुन मुंबईतील लॉकडाऊनची रुपरेषा ठरविण्यात येईल.

big decision on lockdown in mumbai metro region will be taken by BMC


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: big decision on lockdown in mumbai metro region will be taken by BMC