आदित्य ठाकरेंनी करुन दाखवलं, कोरोनाचा 'हा' हॉटस्पॉट कोरोनामुक्तीच्या दिशेनं 

आदित्य ठाकरेंनी करुन दाखवलं, कोरोनाचा 'हा' हॉटस्पॉट कोरोनामुक्तीच्या दिशेनं 

मुंबई- कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव सर्वाधिक हा मुंबई शहरात आहे. त्यातही वरळी कोळीवाडा, धारावी यासारखे भाग तर कोरोनाचे हॉटस्पॉट म्हणून ओळखले जातात. अशातच आजपासून लॉकडाऊन 5.0 ला सुरुवात झाली आहे. मात्र त्यातूनच एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतल्या कोरोनाचा पहिला हॉटस्पॉट ठरलेला वरळी कोळीवाडा आता कोरोनामुक्तीच्या दिशेनं वाटचाल करत आहेत. वरळी कोळीवाड्यात कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर आमदार आदित्य ठाकरे यांनी अत्यंय कठोर नियमावली अंमलात आणली होती. त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या प्रयत्नांना यश आलं असं बोलायला वावगं ठरणार नाही. 

वरळी कोळीवाड्यात गेल्या 20 दिवसांहून अधिक काळ 75 टक्के भागात एकही कोरोनाचा नवीन रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे कोळीवाड्याच्या दहा ते बारा भागांतील म्हणजे सुमारे 60 ते 70 टक्के प्रतिबंधित क्षेत्र खुले करण्यात आलंय. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाऊन असलेल्या नागरिकांना अखेर मोकळा श्वास घेतला आहे. मात्र पुढील अनिश्चित काळासाठी सामाजिक वावर, मास्क, सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्याचे नियम पाळावे लागणारेत. 

वरळी कोळीवाडय़ातील रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळविण्यात महापालिका यशस्वी झाली आहे. कोळीवाडय़ातील 75 टक्केभाग प्रतिबंधित क्षेत्रांच्या यादीतून मुक्त करण्यात आला आहे. मात्र रहिवाशांनी एकमेकांपासून सुरक्षित अंतर पाळण्याच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन पालिकेने केलं आहे. 

प्रतिबंधित क्षेत्राच्या यादीतून मुक्त केलेल्या भागात आवश्यक ती दुकाने आणि भाजीपाला विक्रीलाही परवानगी देण्यात आली आहे. मात्र कोरोनाच्या संसर्गाचा प्रसार होऊ नये यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे बंधनकारक असेल. या संदर्भात वरळी कोळीवाडय़ातील नेते मंडळी, पोलिस आणि पालिका अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगबाबतचे नियम पाळण्याबाबत जनजागृती करण्याची जबाबदारी वरळी कोळीवाडय़ातील नेते मंडळींवर सोपविण्यात आल्याचं पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुंबईतला पहिला हॉटस्पॉट

जी-दक्षिण विभागातील वरळी कोळीवाडा, आदर्श नगर, जिजामाता नगर परिसर हा मुंबईतील करोनाबाधितांचा पहिला हॉटस्पॉट म्हणून ओळखला जात होता. वरळी कोळीवाडय़ातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागल्यामुळे पालिकेच्या जी-दक्षिण विभागाने 29 मार्च रोजी वरळी कोळीवाडा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला. त्यानंतर वरळी कोळीवाडय़ात जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले होते. चौकाचौकात पोलिस उभे होते.

मुंबईत सर्वाधिक रुग्ण या भागात सापडल्याने आणि या विभागातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत गेल्याने पालिकेने हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला होता. त्यानंतर पोलिस आणि पालिकेकडून या भागातल्या नागरिकांसाठी अत्यंय कठोर नियमावलीची आखणी केली होती. कोरोना व्हायरसचा संसर्ग अधिक वाढू नये म्हणून नागरिकांवर निर्बंध घालण्यात आले होते. 

नागरिकांमुळे झालं शक्य 

वरळी कोळीवाडय़ातील रहिवाशांनी सहकार्य केले. त्यामुळेच साथीवर नियंत्रण मिळवता आले आणि 75 टक्के भाग प्रतिबंधित क्षेत्रांच्या यादीतून वगळणे शक्य झाले. जिजामाता नगरमध्येही 26 दिवसांपासून एकही रुग्ण सापडलेला नाही, अशी माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. 

कोळीवाड्यातील 10 ते 12 भाग तसेच जनता कॉलनीतील सहा ते सात भाग प्रतिबंधित क्षेत्रातून वगळण्यात आलेत. उर्वरित 30 टक्के भागात देखील नवीन रुग्ण सापडण्याचे प्रमाण खूप कमी झालं आहे. त्यामुळे हा भाग निरीक्षणाखाली ठेवण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com