esakal | मुंबईत रुग्ण आढळलेल्या भागाचं होणार GIS मॅपिंग; मुंबई पालिकेचा महत्त्वाचा निर्णय 
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत रुग्ण आढळलेल्या भागाचं होणार GIS मॅपिंग; मुंबई पालिकेचा महत्त्वाचा निर्णय 

कोरोनाबाधित रुग्णांवर नजर मुंबई महापालिकेचा हायटेक फॉर्म्युला 

मुंबईत रुग्ण आढळलेल्या भागाचं होणार GIS मॅपिंग; मुंबई पालिकेचा महत्त्वाचा निर्णय 

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई : मुंबईत कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेल्या परिसरांचे जीआयएस मॅपिंग करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्याची कार्यवाहीदेखील सुरू करण्यात आली आहे. मॅपिंगमुळे त्या परिसराचे नकाशे आणि संख्यात्मक माहिती संकेतस्थळावर उपलब्ध होईल. त्यामुळे कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी त्या भागातील नागरिकांवर लक्ष ठेवणे सोपे होणार आहे. 

मोठी बातमी - मुंबईतील वरळी कोळीवाडा केला सील, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

मुंबईच्या विविध भागांत कोरोनाचे संशयित आढळत आहेत. त्यामुळे पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी पालिका अधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून सोमवारी (ता. 30) जीआयएस मॅपिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे करोनाबाधितांची संख्या अधिक असेल, त्या परिसरांचे नकाशे आणि संख्यात्मक माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध होईल. शहरातील कोणत्या भागात कोरोनाबाधित आहेत, कुठे कोरोना संशयितांची संख्या जास्त आहे, याची माहिती नागरिकांनाही मिळू शकेल व ते अधिक सजगपणे स्वतःची काळजी घेऊ शकतील. तसेच त्या परिसरात काही आवश्‍यक कामानिमित्त जाणाऱ्या नागरिकांनाही अधिक सहजपणे प्रतिबंधात्मक उपाययोजना करता येतील. प्रशासनालाही कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आवश्‍यक ती पावले तातडीने उचलण्यास या माहितीचा उपयोग होणार आहे. 

मोठी बातमी - तुमचं आमचं वीजबिल होणार कमी, वाचा कुठे किती टक्के होणार कपात

विद्यार्थ्यांवर जबाबदारी 

कोरोनामुळे आरोग्य सुविधांवर मोठा ताण पडला आहे. त्यामुळे महापालिकेच्या चार वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अंतिम वर्षाला असणाऱ्या विद्यार्थ्यांवर आता ओपीडी (बाह्यरुग्ण विभाग) व प्राथमिक उपचारविषयक बाबींची जबाबदारी दिली जाणार आहे. पालिकेच्या परिचारिका महाविद्यालयातील दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षाच्या विद्यार्थिनींनादेखील कामाचे वाटप केले जाणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. 

कोरोना वॉर रूम सुरू 

पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षामध्ये "कोरोना वॉर रूम' सुरू करण्यात आली आहे. महापालिकेत प्रतिनियुक्तीवर नुकत्याच रुजू झालेल्या अश्विनी भिडे या वॉर रूमच्या प्रमुख समन्वयक आहेत. वॉर रूमच्या माध्यमातून आवश्‍यक ती नियोजनात्मक, प्रतिबंधात्मक व व्यवस्थापकीय कार्यवाही दिवसाचे 24 तास आणि आठवड्याचे सातही दिवस करण्यात येईल. कोरोनाविषयक माहिती एकत्र करून तिचे सातत्याने विश्‍लेषण करण्यात येईल. त्याआधारे नियोजनाची पुढील दिशा निश्‍चित केली जाईल. 

big news BMC to start going GIS mapping to keep tab on covid 19 novel corona cases

loading image
go to top