मोठी बातमी - तुमचं आमचं वीजबिल होणार कमी, वाचा कुठे किती टक्के होणार कपात

मोठी बातमी - तुमचं आमचं वीजबिल होणार कमी, वाचा कुठे किती टक्के होणार कपात

मुंबई - सध्या सगळीकडे कोरोनाची धास्ती आहे. अशात महाराष्ट्र राज्य वीज नियामक मंडळाने महाराष्ट्रात वीज देणाऱ्या विविध कंपन्यांना विजेचे दर कमी करण्याचे आदेश दिले आहेत. राज्य वीज नियामक मंडळाकडून दरवर्षी विजेचे दर निश्चित केले जातात. अशात  यंदाचे महाराष्ट्रातील विजेचे दर निश्चित करण्यात आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरगुती, औद्योगिक आणि शेतीला देण्यात येणाऱ्या वीज पंपांच्या विजेच्या दरात दहा ते १५ टक्के कपात करण्यात येणार आहे. पुढील ३ ते ५ वर्षांसाठी ही कपात करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती स्वतः महाराष्ट्र राज्य वीज नियामक मंडळाचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी यांनी दिली आहे. त्यामुळे तुमचं आमचं विजेचं बिल आता कमी येणार आहे. 

महाराष्ट्रत राज्य वीज नियामक मंडळाचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी यांनी दिलेल्या  माहितीप्रमाणे महाराष्ट्रात एकूण चार वीज कंपन्यांमार्फत वीजपुरवठा करण्यात येतो. यामध्ये महावितरण, बेस्ट, टाटा आणि अदानी यांचा समावेश आहे. या सर्वांना राज्य वीज नियामक मंडळाकडून विजेचे दर कमी करण्याचे आदेश देण्यात आलेत.   

तुमच्या वीजबिलात कितीची कपात ? 

मुंबई - मुंबईमध्ये बेस्ट, टाटा आणि अदानी यांच्यामार्फत वीजपुरवठा केला जातो. या सर्वांना राज्य वीज नियामक मंडळाने वीजदरांमध्ये कपात करण्याचे आदेश दिले आहेत. राज्य वीज नियामक मंडळाने बेस्टला घरगुती ग्राहकांचे वीजदर दिड ते दोन टक्के कमी करण्याचे करण्याचे आदेश दिले आहेत. इंडस्ट्रिअल म्हणजेच औद्योगिक वापरासाठी देण्यात येणाऱ्या विजेच्या दरात ७ टक्के कपात तर दुकानांसाठी म्हणजेच कमर्शिअल वीज दरांमध्ये  ८ टक्के कपात करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याचसोबत TATA आणि अदानी यांनी घरगुती वीजदरात ११ टक्के  कपात करावी, औद्योगिक विजेमध्ये १९ टक्के कपात करावी तर दुकानांमध्ये होणाऱ्या वीजपुरवठ्यावरील वीजदरात १९ टक्के कपात करण्याचे आदेश देण्यात आलेत. 

उर्वरित महाराष्ट्र - उर्वरित महाराष्ट्रात म्हणजेच मुंबई व्यतिरिक्त इतर महाराष्ट्रात केवळ महावितरणकडून वीजपुरवठा केला जातो. अशात राज्य वीज नियामक मंडळाकडून आयोग म्हणून घरगुती ग्राहकांच्या वीजबिलात ५ टक्के कपात करण्याचे निर्देश देण्यात आलेत. या सोबतच रेस्ट ऑफ महाराष्ट्रातील उद्योगधंद्याना पुरवण्यात येणाऱ्या विजेचे दर १० ते ११ टक्के कमी करण्याचे आदेश देण्यात आलेत. कमर्शिअल म्हणजेच दुकानांमध्ये जो वीजपुरवठा होतो त्यांच्या वीजदरात ११ ते १२ टक्क्यांची कपात करण्याचे निर्देश देण्यात आलेत. सोबतच शेती म्हणजेच कृषी पंपांच्या वीजदरात १ टक्का कपात करण्यात यावी असं सांगण्यात आलंय.

आता याचा फायदा महाराष्ट्रातील सर्व ग्राहकां होणार आहे. नवीन वीजदर १ एप्रिलपासून लागू होणार असल्याने मे महिन्याच्या वीजबिलात फायदा मिळणार ग्राहकांना मिळणार आहे. पुढील तीन ते पाच वर्ष वीजदर असेच राहतील असं देखील आनंद कुलकर्णी यांनी सांगितलंय.

maharashtra state electricity regulatory commission gave orders to reduce electricity charges

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com