मोठी बातमी: कोरोना चाचणी आणखी स्वस्त; नवे दर पत्रक जाहीर

सकाळ न्यूज नेटवर्क 
Monday, 7 September 2020

कोरोना चाचणीचे दर आणखी कमी करण्यात आले असून आता केवळ 1200 रूपयात कोरोनाची चाचणी करता येणार आहे.

मुंबई - कोरोना चाचणीचे दर आणखी कमी करण्यात आले असून आता केवळ 1200 रूपयात कोरोनाची चाचणी करता येणार आहे.राज्य सार्वजनिक आरोग्य विभागाने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला असून यामुळे लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे.  

तर कंगना रानौतला व्हावे लागणार क्वारंटाईन! वाचा मुंबईच्या महापौरांची प्रतिक्रीया

कोरोना चाचणी संदर्भातील नव्या शासन निर्णयामुळे लोकांना आता प्रती चाचणी 500 ते 800 रूपये कमी मोजावे लागणार आहेत. नव्या दरपत्रकानुसार कोरोनाच्या चाचणी आता दोन हजार रुपयांच्या आत करता येणार आहे. कोरोना चाचणीसाठी खासगी प्रयोगशाळेत स्वॅब दिल्यास 1200 रुपये आकारले जाणार आहेत. कोविड केअर सेंटर्स, हॉस्पिटल, क्लिनिक, क्वॉरंटाईन सेंटर्समध्ये स्वॅब दिल्यास 1600 रुपये आकारले जाणार आहेत. तर घरी येऊन स्वॅब घेतल्यास 2000 रुपये आकारले जाणार आहेत. या नव्या निर्णयामुळे सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

आरोग्य विभागाने जारी केलेल्या नव्या दर पत्रकानुसार खासगी प्रयोगशोळेत 1,600 रूपये इतका दर निश्ति केला आहे. याआधी राज्यातील खोसगी प्रयोगशाळांमध्ये  2,800 रूपये दर आकारला जात होता. तर प्रयोगशाळेत जाऊन स्वॅब दिल्यास 2,200 रूपये दर निश्चित करण्यात आला होता. 

तारापूरात कारखान्यातून रसायनाची गळती, विषारी वायूमुळे महिलेसह 6 कामगारांना बाधा

भारतीय आयुर्विद्यान संस्था तसेच एनएबीएल मान्यता प्राप्त खासगी प्रयोगशाळांकडून कोरोनासाठी असलेल्या आरटीपीसीआर चाचणीचे दर निश्चित करण्यासाठी समिती गठीत केली होती. या समितीनं त्तकालीन लॉकडाऊन परिस्थितीत मर्यादीत साधन उपलब्धता लक्षात घेऊन चाचणीचे दर निश्चित केले होते. आता मात्र राज्यात अनलॉकची पावलं उचलण्यास सूरूवात झाली आहे. त्यामुळे तपासणीसाठी आवश्यक रिएजंट्स,व्हीटीएम कीट्स व पीपीई कीट्स,एन95 मास्क माफक दरात उपलब्ध झाले आहेत. तसेच आयसीएमआरने विविध उत्पादक कंपन्यांना मान्यता दिल्याने उपलब्धता वाढली आहे. परिणामी त्यांच्या किंमती ही कमी झाल्या आहेत. यासर्व बाबी लक्षात घेऊन नवे दर पत्रक जाहीर करण्यात आले आहेत. 

----------------------------------------------

 (संपादन - तुषार सोनवणे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The big news: Corona testing even cheaper; New rate sheet announced