esakal | फक्त मुंबईसाठी येणार कोरोनाबाबतची नवी नियमावली? वाचा काय विचार आहे महापालिकेचा...
sakal

बोलून बातमी शोधा

फक्त मुंबईसाठी येणार कोरोनाबाबतची नवी नियमावली? वाचा काय विचार आहे महापालिकेचा...

मुंबईला लॉकडाऊनमध्ये शिथीलता देण्याचा आराखडा पुढील दोन दिवसात महापालिका जाहीर करणार आहे.

फक्त मुंबईसाठी येणार कोरोनाबाबतची नवी नियमावली? वाचा काय विचार आहे महापालिकेचा...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : मुंबईला लॉकडाऊनमध्ये शिथीलता देण्याचा आराखडा पुढील दोन दिवसात महापालिका जाहीर करणार आहे. महापालिका मुख्यालयात याबाबत प्राथमिक चर्चा झाली. त्यामुळे संपुर्ण राज्यात नागरीकांचा मॉर्निंग वॉक 3 जून पासून सुरु होणार असला तरी मुंबईत मात्र यासाठी विलंब होण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारने रविवारी लॉकडाऊनमध्ये शिथीलता आणण्यासंदर्भातील नियमावली जाहीर केली आहे. 3 जूनपासून टप्प्या टप्प्याने लॉकडाऊन शिथील करण्यात येणार आहेत. यात नागरिकांना प्रभातफेरीला परवानगी देण्यापासून दुकाने सुरु करणे, व्यवसाय सुरु करण्याची नियमावली प्रसिध्द करण्यात आली आहे.

मोठी बातमी KEM रुग्णालयावर ओढवली 'भीषण' परिस्थिती, वाचा KEM हॉस्पिटलच्या शवागारातील भीषण वास्तव...

मात्र मुंबईसाठी या नियमावलीच्या आधारे स्वतंत्र नियमावली तयार करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्याबाबत मुंबई महापालिकेच्या बड्या अधिकार्यांची बैठक झाली असून पुढिल दोन दिवसात मुंबईसाठीची नवीन नियमावली प्रसिध्द केली जाईल असे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितलंय.

मुंबईत 700 कोविड प्रतिबंधित विभाग आहेत. तर, त्यांच्या बाजूला असलेल्या बफर झोन मध्ये लॉकडाऊन मध्ये कशी शिथीलता द्यावी. तसेच इतर भागात कोणते नियम तयार करावेत याबाबत सारासार विचार करुन निर्णय घेऊ असेही सांगण्यात आले.

मोठी बातमी -  धक्कादायक! पूर्व उपनगरातल्या डोंगरांमध्ये घुसला कोरोना. वस्त्यांमध्ये भीतीचं वातावरण... 

राज्य सरकारने दुकाने सुरु करण्याबाबतही नियमावली तयार केली आहे. त्या रस्त्यांच्या एका बाजूची दुकाने एक दिवस आणि दुसऱ्या बाजूची दुकाने दुसऱ्या दिवशी सुरु ठेवायची आहेत. त्या आधाराने नियोजन करण्यात येईल. तसेच इतर मुद्द्याचा विचार करुन त्याची मुंबईत कशा प्रकारे अमंलबाजावणी करता येईल याबाबत निर्णय होणार आहे.

मुंबईत रुग्णवाढीचा वेग कमी करण्यात आतापर्यंत यश आले आहे. मात्र,लॉकडाऊन मध्ये शिथीलता मिळाल्यास गर्दी वाढून सर्व मेहनत वाया जाण्याची भिती आहे. त्यामुळे एकाच वेळी सर्वच ठिकाणी गर्दी होणार नाही अशा पध्दतीने नियोजन करण्याची मागणी नगरसेवकांकडून केली जात आहे.

big news for MMR separate rules and regulation may be implemented in mumbai amid corona