धक्कादायक! पूर्व उपनगरातल्या डोंगरांमध्ये घुसला कोरोना. वस्त्यांमध्ये भीतीचं वातावरण... 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 मे 2020

पूर्व उपनगराचा बहुतांश भाग डोंगराने व्यापला आहे. या भागात गेल्या महिनाभरापासून कोरोंना पसरू लागला आहे. वरळी, धारावी पाठोपाठ पूर्व उपनगराला कोरोनाचा विळखा पडला आहे. कोरोनाची मोठी दहशत येथील वस्त्यांमध्ये निर्माण झाली आहे. 

मुंबई:  पूर्व उपनगराचा बहुतांश भाग डोंगराने व्यापला आहे. या भागात गेल्या महिनाभरापासून कोरोंना पसरू लागला आहे. वरळी, धारावी पाठोपाठ पूर्व उपनगराला कोरोनाचा विळखा पडला आहे. कोरोनाची मोठी दहशत येथील वस्त्यांमध्ये निर्माण झाली आहे. 

हेही वाचा: ''मला गर्भपाताची परवानगी द्या'' ; कोणी केली मागणी?..वाचा.. 

डोंगर भागातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. हा भाग दाटीवाटीचा असल्याने येथे सोशल डिस्टनसिंग नाही. धारावी प्रमाणे या वस्त्यांमध्येही चिंचोळ्या गल्ल्या आहेत. दहा बाय बाराच्या घरात सात ते आठ माणसे रहात आहेत. एखाद्या व्यक्तीला कोरोनाचा झाला तर घरातील सर्वच व्यक्तीना क्वारंटाईन केले जात आहे. अशी अनेक कुटुंबे सध्या क्वारंटाईन आहेत. 

कुर्ला येथील भाभा रुगणालय, गोवंडी येथील शताब्दी रुगणालय, घाटकोपरच्या पश्चिमेस असलेले संत मुक्ताबाई हॉस्पिटल, मुलुंड येथील अगरवाल रुग्णालय आदी रुगणालयात प्रचंड गर्दी होत आहे. कोरोनाच्या संशयित रुग्णाना रुगणालयात जागा नसल्याने आता कोरोनाच्या रुग्णाना घरातच क्वारंटाईन केले जात आहे. 

हेही वाचा: अरे वाह ! खालापुरात कोरोना योद्धांना पीपीई कीटचं वाटप 

डोंगर भागात अस्वच्छतेमुळे तापाची साथ पसरू लागली आहे. कोरोनासोबत आता तापाच्या रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. तापामुळेही मृत्यू होऊ लागले आहेत. नागरिकांच्या स्वॅब टेस्ट होत नाहीत. या टेस्ट झाल्यास रुग्ण झपाट्याने वाढतील असे या भागातील नगरसेवकांना वाटत आहे. 

मुंबईच्या बातम्यांसाठी इथे क्लिक करा..

corona enters in east side of mumbai now read full story 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona enters in east side of mumbai now read full story