आज दुपारी २ वाजता मुंबईत घडणार मोठी राजकीय घडामोड

पूजा विचारे
Friday, 23 October 2020

राज्याच्या राजकारणात आज दुपारी २ वाजता मुंबईत मोठी घडामोड घडणार आहे. गेल्या ४० वर्षांपासून भाजपामध्ये असणारे एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीररित्या प्रवेश करतील. मुंबईतल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात एकनाथ खडसे पक्षप्रवेश करतील.

मुंबईः राज्याच्या राजकारणात आज दुपारी २ वाजता मुंबईत मोठी घडामोड घडणार आहे. गेल्या ४० वर्षांपासून भाजपामध्ये असणारे एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीररित्या प्रवेश करतील. मुंबईतल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात एकनाथ खडसे पक्षप्रवेश करतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत खडसे पक्षप्रवेश करतील. दरम्यान आपल्यासोबत एकही आमदार किंवा खासदार राष्ट्रवादीत येणार नसल्याचं एकनाथ खडसेंनी आधीच स्पष्ट केलंय.

गुरुवारी दुपारी एकनाथ खडसे जळगावहून स्पेशल चार्टर्ड हेलिकॉप्टरनं कुटुंबासह मुंबईत दाखल झाले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे आणि कन्या रोहिणी खडसेही होत्या. 

अधिक वाचा-  मुंबई पोलिसांच्या विशेष कार्य पथकाचा विशेष भत्त्याचा मार्ग मोकळा

एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसेही राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. तर सून रक्षा खडसे भाजपमध्येच राहतील.  एकनाथ खडसेंसोबत जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्य़ांतील त्यांचे समर्थकही पक्षात प्रवेश करणार आहेत, असं जयंत पाटील यांनी सांगितलं आहे. तसंच खडसे यांच्या पुनर्वसनाबाबत कोणी चिंता करू नये, असंही ते म्हणाले आहेत.

अधिक वाचा-  'पप्पू' ट्विट कंगनाला पडणार महागात, आणखी एक फौजदारी तक्रार दाखल

Big political event Mumbai at 2 pm today Eknath Khadse will join NCP


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Big political event Mumbai at 2 pm today Eknath Khadse will join NCP