मोटार वाहन करदात्यांना दिलासा, परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांचे महत्त्वाचे आदेश...

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 10 June 2020

लाॅकडाऊन काळात मालवाहतूक करणारे वाहन, प्रवासी वाहतूकीचे वाहन आणि व्यवसायीक वाहनांना तपासणी न करताच सरसकट मोटार वाहन कर माफी करण्याचे आदेश राज्य परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी दिले आहे.

मुंबई : लाॅकडाऊन काळात मालवाहतूक करणारे वाहन, प्रवासी वाहतूकीचे वाहन आणि व्यवसायीक वाहनांना तपासणी न करताच सरसकट मोटार वाहन कर माफी करण्याचे आदेश राज्य परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी दिले आहे. त्यामूळे लाॅकडाऊन काळात उभ्या असलेल्या वाहनांना मोटार वाहन कर माफ करतांना कोणत्याही प्रकारची तपासणी होणार नसून या वाहन चालक आणि मालकांना दिलासा मिळणार आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर राज्यात 22 मार्च पासून लाॅकडाऊन करण्यात आले आहे. यादरम्यान फक्त काहीप्रमाणात मालवाहतूकीची वाहने सुरू आहे. तर प्रवासी वाहतूक आणि व्यवसायीक वाहनांना परवानगी नसल्याने बंद आहे. त्यामूळे अशा नाॅन युज वाहनांना मोटार वाहन कर माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामध्ये वन टाईन कर भरणाऱ्या वाहनांना कोणताही लाभ मिळणार नसून, मालवाहतूक करणारे ट्रक, एसटी बस, ट्रॅव्हल्स, जेसीबी, पोकलॅन्ड, ट्रॅक्टर अशा वाहनांचा समावेश आहे. 

मोठी बातमी - आयआयटी मुंबईने मिळवला देशात पहिला क्रमांक; नेमकं कुठे वाचा सविस्तर...

लाॅकडाऊन काळात सुमारे दोन महिने या वाहनांना वापर झाला नसल्याने, वाहतूकदार संघंटनांनी वाहनांची तपासणी न करता सर्व वाहनांची करमाफी करण्याची मागणी केली होती. त्याशिवाय अर्ज केलेले आणि अर्ज न केलेल्या वाहनांना सुद्धा सरसकट कर माफी देण्याची सुद्धा त्यामध्ये मागणी करण्यात आली होती. त्यामूळे यातील वाहन चालक,मालकांना या निर्णयामूळे दिलासा मिळाला आहे. 

वाहन कार्यरत असल्याचे आढळ्यास कारवाई

राज्य परिवहन विभागाने लाॅकडाऊन काळातील नाॅन युज वाहनांना विनातपासणी मोटार वाहन कर माफी देण्यात येणार आहे. करमाफीचा लाभ दिल्यानंतर संबंधीत वाहनांचा लाॅकडाऊन काळात वापर झाल्याची माहिती परिवहन विभागाला मिळाल्यास, संबंधीत वाहनांकडून व्याजासहीत कर वसूली करण्यात येणार असल्याचे परिवहन विभागाने सांगितले आहे. 

मोठी बातमी - आयआयटी मुंबईचा नवा अंदाज.. पावसाळ्यात कोरोनाचा फैलाव वाढणार?  वाचा नेमकं काय आहे तर...

राज्यातील माल व प्रवासी वाहतूकदारांसोबत राज्य सरकारची व्हिडीओ काँन्फरंन्सींद्वारे झालेल्या चर्चामध्ये कोरोनाच्या पार्श्वभुमीवरील लाॅकडाऊन काळातील ट्रॅक, बस, वाहनांचा कर 30 जुन पर्यंत माफ करण्याची मागणी केली होती. मात्र परिपत्रक काढतांना, फक्त ज्या वाहनांनी आपल्या गाडीच्या नाॅन युजचा अर्ज केला आहे. अशाच वाहनांना कर माफ करण्याचे आदेश काढले आहे. राज्य सरकारने सर्व माल, प्रवासी वाहनांना कराची माफी द्यावी, कर्नाटक, गुजरात राज्यात याप्रमाणेच सरसकट कर माफीचा आदेश काढण्यात आला आहे. - - बाबा शिंदे, अध्यक्ष, राज्य माल व प्रवासी वाहतूकदार संघंटना

big relief to stand still vehicles during lockdown commissioner shekhar channes orders


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: big relief to stand still vehicles during lockdown commissioner shekhar channes orders