आयआयटी मुंबईने मिळवला देशात पहिला क्रमांक; नेमकं कुठे वाचा सविस्तर... 

iitb
iitb

मुंबई :  विद्यापीठाचा दर्जा, विद्यापीठातील कर्मचाऱ्यांची क्षमता, प्राध्यापकांची गुणवत्ता, प्राध्यापक - विद्यार्थी यांची गुणोत्तर, त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय प्राध्यापक आणि विद्यार्थी यांचे प्रमाण यावर क्यूएसतर्फे विद्यापीठाचा दर्जा ठरवून त्यांना क्रमवारी दिली जाते. बुधवारी जाहीर केलेल्या क्रमवारीत आयआयटी मुंबईने देशात अव्वल स्थान पटकावले आहे. त्याखालोखाल इंडियन इन्स्टिटयूट ऑफ सायन्स बंगळुरू आणि आयआयटी दिल्लीने अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला आहे. 

विद्यापीठांची जागतिक क्रमवारी ठरवणारे क्यूएस जागतिक विद्यापीठ रँकिंग  बुधवारी (ता.10) जाहीर झाले. यामध्ये आयटीआय मुंबईने देशात अव्वल स्थान मिळवले आहे. त्याखालोखाल इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आणि आयआयटी दिल्लीने स्थान मिळवले आहे. मात्र पहिल्या 100 मध्ये देशातील एकाही विद्यापीठ किंवा शैक्षणिक संस्थेला स्थान मिळवता आलेले नाही. या तिन्ही संस्थाना 200 च्या यादीत स्थान मिळाले आहे.

देशात अव्वल असलेल्या या तिन्ही संस्थांना जागतिक क्रमवारीत 150 मध्येही स्थान मिळवता आले नाही. आयआयटी मुंबईला 46 गुण मिळाले असून, विद्यापीठाचा दर्जा 50.4, विद्यापीठातील कर्मचाऱ्यांची क्षमता 74.2,  प्राध्यापकांची गुणवत्ता 53.1, प्राध्यापक - विद्यार्थी यांची गुणोत्तर 36.2, आंतरराष्ट्रीय प्राध्यापक 3.9, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी 1.6 असे गुण मिळाले आहेत. हे गुण 100 पैकी देण्यात आले आहेत. 

वाचा ः कोरोना रुग्णसंख्येत मुंबईने वुहानला मागे सोडले, तर महाराष्ट्र चीनच्याही पुढे​

गतवर्षीच्या तुलनेत घसरण
आयआयटी मुंबईने जागतिक क्रमवारीत 172 वा क्रमांक मिळवला असून, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (बंगळुरू) 185 व्या आणि आयआयटी दिल्ली 193 व्या क्रमांकावर आहेत. मागील वर्षी आयआयटी मुंबईचा 152 वा क्रमांक होता, तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (बंगळुरू) व आयआयटी दिल्ली अनुक्रमे 184 आणि 182 व्या स्थानावर होते.

iit mumbai ranked one in qs world wide university ranking read important news

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com