वाहतूकदारांना दिलासा ! वार्षिक कराच्या रक्कमेत 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय

भाग्यश्री भुवड
Tuesday, 15 September 2020

लॉकडाऊनमुळे आर्थिक नूकसान झालेल्या सर्व वाहतूकदारांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे

मुंबई : लॉकडाऊनमुळे आर्थिक नूकसान झालेल्या सर्व वाहतूकदारांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे. विवीध परिवहन वाहनांना वार्षिक करामध्ये 50 टक्के सुट देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महाराष्ट्र मोटार वाहन कर अधिनीयमाच्या तरतूदीअंतर्गत 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2021 पर्यंतच्या वार्षिक करामध्ये 50 टक्क्यापर्यत सूट जाहिर केली आहे. मात्र 31 मार्च 2020 रोजी किवा त्यापुर्वी गेल्या वर्षीचा वार्षिक कर भरणाऱ्या वाहतूकदारांना ही सवलत लागू होणार आहे.

कोविडमुळे 25 मार्चपासून देशभर टाळेबंदी लागू करण्यात आली होती. या टाळेबंदीमुळे या काळात वाहनाची चाके जागच्या जागी थांबली होती. त्यामुळे आर्थिक संकटात आलेल्या या वाहनचालकांना दिलासा देणे आवश्यक होत. त्याअंतर्गत ही सवलत देत असल्याचे या आदेशात म्हटले आहे. या काळात वाहतूकदारांच्या संघटनांनी करमाफी देण्याची मागणी केली होती. त्यानूसार हा निर्णय झाला आहे.  

गुड न्यूज आली, आता वकिलांनाही मुंबईच्या लोकल ट्रेनमधून प्रवासास परवानगी

या वाहन मालकांना मिळणार सूट 

  • मालवाहतूक वाहने- सवलत- 50 टक्के
  • पर्यटक वाहने- सवलत 50 टक्के 
  • खनित्रे – सवलत 50 टक्के 
  • खाजगी सेवा वाहने- सवलत 50 टक्के 
  • व्यावसायिक कँपर्स वाहने- सवलत 50 टक्के 
  • स्कूल बस/वाहने- सवलत 50 टक्के

( संपादन - सुमित बागुल )

big relief to transporters government declared 50 percent deduction in taxes amid corona 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: big relief to transporters government declared 50 percent deduction in taxes amid corona