मोठी बातमी : धनंजय मुंडे फिट अँड फाईन, मिळाला हॉस्पिटलमधून डिशचार्ज...

सकाळ वृत्तसेवा
Monday, 22 June 2020

राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी यशस्वीरित्या कोरोनावर मात केली आहे.

मुंबई- राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी यशस्वीरित्या कोरोनावर मात केली आहे. दहा दिवसांपूर्वी मुंडे यांना कोरोनाची लागण झाली होती. धनंजय मुंडे ठणठणीत असल्याने त्यांना आज संध्याकाळी डिस्चार्ज दिला दिला गेलाय. धनंजय मुंडे यांच्यावर मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. आता  डिस्चार्ज दिल्यानंतर त्यांना पुढील 14 दिवस घरातच क्वारंटाईन करण्यात येणार आहे. त्यानंतर ते लगेचच कामात रुजू होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 

धनंजय मुंडे यांच्यासह 5 जणांना कोरोनाची लागण झाली होती. धनंजय मुंडे यांच्यासह त्यांचे दोन स्वीयसहायक, मुंबईतील वाहन चालक, बीडचा स्वयंपाकी आणि बीडचा वाहनचालक अशा पाच जणांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. विशेष म्हणजे यापैकी कुणामध्येही कोरोनाची लक्षणं दिसून आली नव्हती. दिलासादायक म्हणजे धनंजय मुंडेंच्या कुटुंबियांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला होता. धनंजय मुंडेंना कोरोनाची लागण झाल्यानंतर बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार हेदेखील काही दिवस होम क्वारंटाईन झाले होते.

BIG NEWS कोरोनावर आलेल्या १०३ रुपयांच्या 'फॅबि-फ्लू' या गोळीबद्दल महत्त्वपूर्ण माहिती...

धनंजय मुंडे यांना श्वास घेताना त्रास होत असल्याने त्यांना 12 जून रोजी तातडीने ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मुंडे यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. गेल्या 11 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. आता त्यांची प्रकृती ठिक आहे. 

धनंजय मुंडे हे बीडमधील परळीचे आमदार आहेत. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते आमदारपदी निवडून आले. दरम्यान, या आधी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यांनीही कोरोनावर यशस्वीपणे मात केली.

big update from breach candy hospital dhananjay munde and corona virus


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: big update from breach candy hospital dhananjay munde and corona virus