समुद्रात मुर्ती विसर्जनाबाबत आली सर्वात मोठी बातमी; जाणून घ्या BMC ने काय दिल्या आहेत सूचना

समीर सुर्वे
Wednesday, 12 August 2020

यंदा कोविड साथीमुळे समुद्रात विसर्जन करण्यास मनाई करण्यात आली आहे.अशी चर्चा होती.मात्र,विसर्जनास मनाई नसून 1 ते 2 किलोमिटर परीसरातील नागरीकांनी समुद्रात विसर्जन करण्यास हरकत नाही

मुंबई : समुद्रात गणपती मुर्तीचे विसर्जन करण्यास कोणत्याही प्रकारची मनाई करण्यात आलेली नाही. मात्र, कोविड साथीचा धोका लक्षात घेता गर्दी होऊ नये म्हणून 1 ते 2 किलोमिटरच्या परीसरातील नागरीकांनी समुद्रात विसर्जन करावे असे महानगर पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.यासाठी कृत्रिम तलवांची संख्या वाढवून 34 वरुन तब्बल 167 करण्यात आली आहे.

दरवर्षी मुंबईतील समुद्र किनाऱ्यावर गणपतीचे विसर्जन सर्वाधिक होते. खासकरुन पश्‍चिम उपनगर आणि शहर भागातील मुर्तींचे विसर्जन हे समुद्रात होते.मुंबईत साधारण 3 हजारच्या आसपास नोंदणीकृती सार्वजनिक मंडळं आहेत तर लाखहून अधिक घरगुती गणपतीचे प्रतिष्टापना होता.

नवी मुंबईतील खासगी रुग्णांच्या लुटमारीला महापालिकेचा चाप; आयुक्तांकडून कारवाईचा इशारा

यंदा कोविड साथीमुळे समुद्रात विसर्जन करण्यास मनाई करण्यात आली आहे.अशी चर्चा होती.मात्र,विसर्जनास मनाई नसून 1 ते 2 किलोमिटर परीसरातील नागरीकांनी समुद्रात विसर्जन करण्यास हरकत नाही.लांबवरुन येणाऱ्या भाविकांनी त्यांच्या जवळच्या कृत्रिम तलावात विसर्जन करावे.अशी सुचना करण्यात आली असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.मागील वर्षी संपुर्ण मुंबईत 34 कुत्रिम तलाव तयार करण्यात आले होते.मात्र,यंदा ही संख्या 167 पर्यंत वाढविण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.

Corona Virus:ठाण्यातील परिस्थिती चिंताजनक, आता मिशन घोडबंदर

गणेशोत्सवासाठी मुंबई महानगर पालिका आणि राज्य सरकारने नियमावली तयार केली आहे.त्यात विसर्जन मिरवणुन काढण्यावर बंदी करण्यात आली आहे.तसेच,सार्वजनिक मंडळांसाठी 10 आणि घरगुती गणेशोत्सवासाठी 5 पेक्षा जास्त भाविकांना विसर्जनात सहभागी होता येणार नाही.त्याच बरोबर नैसर्गिक विसर्जन स्थळांवर न जाता नागरीकांनी कृत्रिम तलावात विसर्जन करावे.अशी सुचनाही पालिकेने केली आहे.

प्रतिबंधीत क्षेत्रात असलेल्या अथवा सिल इमारतींमध्ये असलेल्या सार्वजनिक गणेशमुर्तीचे विसर्जन मंडपातच टाकी बांधून करावे.तसेच,घरगुती गणपतीचे विसर्जन अशाच पध्दतीने करावे असेही पालिकेकडून सांगण्यात आले आहे.

-------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The biggest news came about the immersion of idols in the sea; Find out the instructions given by BMC