बिहार निवडणूक 2020: शिवसेनेला धनुष्यबाण चिन्हावर लढता येण्याची शक्यता कमी

समीर सुर्वे
Friday, 9 October 2020

बिहार विधानसभा निवडणूक शिवसेनेला धनुष्यबाण चिन्हावर लढता येण्याची शक्यता कमी आहे. 50 जागा पूर्ण ताकीदीने लढण्याचा शिवसेनेचा विचार आहे. वेळ पडल्यास 150 जागा लढण्याचा पक्षाचा विचार आहे.

मुंबईः  बिहार विधानसभा निवडणूक शिवसेनेला धनुष्यबाण चिन्हावर लढता येण्याची शक्यता कमी आहे. 50 जागा पूर्ण ताकीदीने लढण्याचा शिवसेनेचा विचार आहे. वेळ पडल्यास 150 जागा लढण्याचा पक्षाचा विचार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेही प्रचाराला जाण्याची शक्यता आहे. बिहार विधानसभेत एकूण २४३ जागांपैंकी केवळ ५० जागांवर शिवसेनेकडून उमेदवार उभे केले जाणारेत.

2015 मध्ये शिवसेना 80 जागा लढली होती. तेव्हा त्यांना 2 लाख 11 हजारांच्या आसपास मतं मिळाली होती. यंदा आदित्य ठाकरे यांनी स्वतः बिहार निवडणुकीत रस घेतला आहे. 50 जागा लढण्याचा पक्षाचा विचार आहे. वेळ पडल्यास 150 जागांपर्यंत उमेदवार उभे करण्याची तयारी शिवसेनेने केली आहे.

अधिक वाचाः  ५ हजार खाटांचे रुग्णालय सरकारने सांभाळावे, पालिका आयुक्तांचे पत्र

या निवडणुकीसाठी शिवसेनेने 20 स्टार  प्रचारकांची यादी निवडणुक आयोगाला सादर केली आहे.यात, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह महाराष्ट्रातील 14 नेत्यांचा समावेश आहे. तर,6 स्थानिक नेत्यांचा समावेश आहे.

हेही वाचाः  मराठी बोलण्यास नकार दिल्यानं लेखिकेचा ज्वेलर्सच्या दुकानाबाहेरचं ठिय्या

महाराष्ट्रातून ठाकरे पिता पुत्रांसह मंत्री सुभाष देसाई, गुलाबराव पाटील, खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, राहुल शेवाळे, विनायक राऊत, अनिल देसाई, प्रियांका चतुर्वेदी, माजी खासदार चंद्रकांत खैरे, राजकुमार बाफना, कृपाल तुमाने, सुनिल चिटणीस हे महाराष्ट्रातून प्रचाराला जाणार आहेत. योगराज शर्मा, कौशलेंद्र शर्मा, विनय शुक्ला, गुलाबचंद दुबे, अखिलेश तिवारी, अशोक तिवारी या स्थानिक नेत्यांचाही स्टार प्रचारांकांच्या यादीत समावेश आहे.

----------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Bihar Assembly elections 2020 Shiv Sena planning contest 50 seats


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bihar Assembly elections 2020 Shiv Sena planning contest 50 seats