​Bihar Election : मुंबईतील बिहारींच्या बिहार विधानसभा निकालानंतर काय आहेत अपेक्षा?

​Bihar Election : मुंबईतील बिहारींच्या बिहार विधानसभा निकालानंतर काय आहेत अपेक्षा?

मुंबई : बिहार निवडणुकांचे निकाल आज लागणार आहेत. सकाळपासून मतमोजणी देखील सुरु आहे. NDA आणि महागठबंधनमध्ये अटीतटीचा सामना रंगताना पाहायला मिळतोय. यंदा कोरोनाच्या महामारीत बिहारमध्ये निवडणुका पार पडल्यात. अशात वोटर्सची गर्दी कमी करण्यासाठी वोटिंग बुथची संख्या वाढवण्यात आली होती. यामुळेच मतमोजणीला अधिकचा वेळ लागताना पाहायला मिळतोय.

दरम्यान यंदाच्या बिहार निवडणुकांमध्ये महत्त्वाचे २ मुद्दे गाजलेत. त्यामधील पहिला मुद्दा म्हणजे सुशांत सिंह राजपूतचं बिहार निवडणुकांमध्ये वापरलं गेलेलं नाव आणि कोरोना लॉकडाऊनमुळे मुंबईतील बिहारमध्ये परतलेल्या बिहारी नागरिकांचा मुद्दा. मुंबई आणि बिहारी माणूस यांचं जुनं नातं आहे. मोठ्या संख्येने बिहारी नागरिक मुंबईत रोजगारासाठी येत असतात. त्यांचा उदरनिर्वाह मुंबईतून चालतो. मुंबईतील बिहारी नागरिकांना आजच्या बिहारच्या निकालांवर काय वाटतं आणि निकालानंतर त्यांच्या काय अपेक्षा आहेत त्या आम्ही जाणून घेण्याचा केलेला हा प्रयत्न.  

मुंबईतील बिहारी नागरिकांना बिहार निवडणूक निकालानंतर काय हवंय : 

मुंबईत अनेक बिहारी नागरिक कामानिमित्त इथे येत असतात. त्यामुळे इथल्या बिहारी नागरिकांची महत्त्वाची मागणी म्हणजे बिहारमध्ये रोजगार निर्माण केले जावेत हीच आहे. बिहारमध्ये कंपन्या याव्यात आणि अधिकाधिक मालाचे उत्पादन केले जावे. जेणेकरून बिहारी माणसांना मुंबईत येण्याची गरज भासणार नाही. सर्वाधिक मुंबईकर बिहारींनी हाच मुद्दा अधोरिखित केला. स्वतःच्या राज्यात, स्वतःच्या गावात आपल्या परिवारासोबत राहून नोकरी करता यावी हीच आमची इच्छा असते. मात्र तिथे काम मिळणे कठीण आहे आणि दोनवेळेचं जेवण उपलब्ध होऊ शकत नाही. म्हणून आम्हीही मुंबईत येतो. बिहारमध्ये इंडस्ट्री आल्यात तर आम्हाला इथे यावे लागणार नाही हे अनेकांनी वारंवार सांगितलं.

रस्ते नीट करा : 

गावातील रस्त्यांबाबत देखील अनेकांनी आपली मते मांडलीत. गावातील रस्ते हे नितीश कुमार पहिल्या टर्मचे मुख्यमंत्री होते तेंव्हा चांगले झालेत. त्यानंतर पुढील दहा वर्षात म्हणजे दुसऱ्या आणि तिसऱ्या टर्ममध्ये नितीश कुमार यांनी फारसं काम केलं नाही, असं मुंबईतील बिहारी नागरिकांचं म्हणणं आहे. त्यामुळे बिहारमधील रस्त्यांवर लक्ष दिलं जावं ही अपेक्षा मुंबईतील बिहारींनी केली. 

शिक्षणव्यवस्था अधिक चांगली करण्याची गरज

शिक्षणाचा मुद्दा देखील मुंबईतील बिहारी नागरिकांनी उपस्थित केला. बिहारमध्ये शिक्षणव्यवस्था अधिक चांगली करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

bihar election results expectation of mumbai based bihari after bihar election results

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com