esakal | ​Bihar Election : बिहार निवडणूक निकाल व्हाया 'जस्टीस फॉर सुशांत' आणि  'ना भूले हैं, ना भूलने देंगे'!
sakal

बोलून बातमी शोधा

​Bihar Election : बिहार निवडणूक निकाल व्हाया 'जस्टीस फॉर सुशांत' आणि  'ना भूले हैं, ना भूलने देंगे'!

'जस्टीस फॉर सुशांत', 'ना भूले हैं, ना भूलने देंगे' हे तर होतंच,  मात्र त्यासोबत या फोटोंवर भाजपचं निवडणूक चिन्ह म्हणजे कमळाचे फुल देखील लावण्यात आले होते. 

​Bihar Election : बिहार निवडणूक निकाल व्हाया 'जस्टीस फॉर सुशांत' आणि  'ना भूले हैं, ना भूलने देंगे'!

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई : बिहार निवडणूक निकाल कमालीचे चुरशीचे होतायत. सकाळी आघाडीवर असणारं महागठबंधन दुपारी १.०० वाजताच्या सुमारास काहीसं बॅकफूटवर गेलेलं पाहायला मिळतंय. दुपारी एक वाजेपर्यंत आलेल्या कलांमध्ये NDA १२५ तर महागठबंधन १०६ जागांवर आघाडीवर होतं. यंदाच्या निवडणुकीत बिहारमधील राजकारण तापलं ते एका महत्त्वाच्या मुद्द्यावरून. हा मुद्दा होता मुंबईत झालेला सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचा. सुशांतची हत्या की आत्महत्या, "बिहार का बेटा", "ना भूले हैं, ना भूलने देंगे" हे मुद्दे बिहार निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरले गेलेत आणि त्याचं मोठ्या प्रमाणात राजकारण केलं गेलं. अगदी त्याची झळ मुंबईलाही बसलेली पाहायला मिळाली. 

महत्त्वाची बातमी : बिहारमध्ये 'जंगलराज' संपून 'मंगलराज' येणार; बिहार निवडणुकांच्या निकालांवर संजय राऊतांची कमेंट

बिहार निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राजकीय पक्षांनी मोठ्या प्रमाणात राजकारण करण्यास सुरवात केली. या सर्वात भाजपने मृत सिने अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या नावाचा मोठ्या प्रमाणात वापर केला आणि लोकांना आपल्याकडे झुकवण्याचा प्रयत्न देखील केला. सुशांतच्या मृत्यूचा बिहार निवडणुकांमध्ये 'चुनावी मुद्दा' म्हणून मोठ्या प्रमाणात झालाच असं विश्लेषक म्हणतात. 

'ना भूले हैं, ना भूलने देंगे'

याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे, भाजपमधील कला आणि संस्कृती सेलचे बिहार संयोजक वरुणकुमार सिंह यांनी सुशांतच्या फोटोंचा मोठ्या प्रमाणात केलेला वापर. सुशांत सिंह राजपूतचे फोटो वापरून त्यावर 'जस्टीस फॉर सुशांत' आणि  'ना भूले हैं, ना भूलने देंगे' या सारखे शब्द निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन मुद्दाम वापरले गेलेत असं राजकीय विश्लेषक म्हणतात. बिहारमध्ये वरून कुमार यांच्याकडून तब्बल ३० हजार स्टिकर्स आणि ३० हजार मास्क देखील बनवले गेलेत, ज्यांचं सर्वसामान्यांमध्ये वाटप देखील केलं गेलं. यामध्ये वरुण कुमार यांनी सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी आपण हे सर्व करत असल्याचं सांगितलं होतं. मात्र हेही निवडणुकांसाठीच असल्याचं विश्लेषक सांगतात. 

महत्त्वाची बातमी : सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा; परिवहन मंत्र्यांना अटक करा, भाजप नेत्यांची मागणी

आणि फोटोंवर लागलं भाजपचं कमळ  

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुशांतचे जे पोस्टर्स लागलेत त्यावर 'जस्टीस फॉर सुशांत', 'ना भूले हैं, ना भूलने देंगे' हे तर होतंच,  मात्र त्यासोबत या फोटोंवर भाजपचं निवडणूक चिन्ह म्हणजे कमळाचे फुल देखील लावण्यात आले होते. 

दरम्यान,  दुपारपर्यंतच्या निवडणूक कलांमध्ये सकाळी आघाडीवर असणारे राष्ट्रीय जनता दल आणि त्यांचं महागठबंधन NDA च्या तुलनेत काहीसं बॅकफुटवर गेलेलं पाहायला मिळतंय. त्यामुळे सुशांतच्या मुद्द्याचा वापर भाजपाला फायद्याचा ठरतोय असं म्हंटल तर वावगं ठरू नये. 

bihar election results via use of sushant sinh rajputs name for political campaign  

loading image