बिहारमध्ये मराठमोळ्या लेडी सिंघमचा डंका

महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मुंबईकर अभिजीत धुरत यांच्या सायली या भगिनी आहेत
sayali dhurat
sayali dhuratsakal media

बिहार राज्यातील अररिया जिल्हा न्यायालयाने एका अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्कारप्रकरणी मुख्य आरोपीला फाशीची शिक्षा ठोठावली आहे. अररिया जिल्ह्याच्या तत्कालीन मराठमोळ्या पोलिस अधीक्षक सायली धुरत यांनी या प्रकरणात कसोशीने तपास करून पुरावे गोळा केले. न्यायालयानेही हे पुरावे ग्राह्य धरून आरोपीला फाशीची शिक्षा ठोठावली आहे. याबद्दल धुरत यांचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. देशाच्या पोलिस दलात महाराष्ट्रातील अनेक पुरुष आणि महिला अधिकाऱ्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. अशा नावांच्या यादीमध्ये आता अधीक्षक सायली धुरत यांनीही स्थान मिळवले आहे.

sayali dhurat
हायकोर्टाकडून सेशन्स कोर्टाचा निर्णय रद्द, देशमुख पुन्हा ईडीच्या ताब्यात

बिहारमध्ये १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी २०१९ मध्ये जत्रेत बेपत्ता झाली होती. त्यानंतर तिचा मृतदेह सापडला होता. सदर गुन्ह्याचा तपास पोलिस अधीक्षक सायली धुरत यांच्याकडे आला. धुरत यांनी पुरावे गोळा करीत न्यायालयात सादर केले. या पुराव्यांवर न्यायालयाने शिक्कामोर्तब करत सिमराहा येथील आरोपी अमर कुमारला दोषी ठरवून फाशीची शिक्षा ठोठावली. अन्य तीन आरोपींविरोधात पोलिस तपास सुरू आहे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा पोक्सो न्यायाधीश शशिकांत राय यांनी हा निकाल दिला. तसेच मृत मुलीच्या आईला १० लाख रुपये देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.

sayali dhurat
दिल्ली पुन्हा प्रदूषणाच्या विळख्यात

सांघिक कामाचे यश

महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मुंबईकर अभिजीत धुरत यांच्या सायली या भगिनी आहेत. न्यायालयाच्या निकालाचे पोलिस अधीक्षक सायली धुरत यांनी स्वागत केले. आपल्या संपूर्ण पथकाने केलेल्या तपासामुळे या नृशंस गुन्ह्यातील आरोपीला शिक्षा सुनावली गेल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. आमच्या सर्व टीमने सांघिक काम केल्याचा उल्लेख धुरत यांनी आवर्जून केला. धुरत यांना यापूर्वी उत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रपती पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com