'मुंबईत आलेले बिहारचे पोलीस, भाजपा पदाधिकाऱ्यांच्या गाडीतून फिरले'; शिवसेना खासदाराचा आरोप

कृष्ण जोशी
Saturday, 1 August 2020

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणी तपास करण्यासाठी मुंबईत आलेले बिहारचे पोलीस येथील भाजपा पदाधिकाऱ्यांच्या गाडीतून फिरले, असा आरोप शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे.

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणी तपास करण्यासाठी मुंबईत आलेले बिहारचे पोलीस येथील भाजपा पदाधिकाऱ्यांच्या गाडीतून फिरले, असा आरोप शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे. याप्रकरणी भाजप नेत्यांनी काल राज्य सरकारमधील एका तरुण मंत्र्याला लक्ष्य केले होते. त्याला प्रत्युत्तर देताना सावंत यांनी, याप्रकरणी भाजपा नेत्यांकडे पुरावे असतील तर ते सरकारला द्यावेत. तसेच आरोप करताना नाव घ्यावे. अशीही मागणी केली.

पोलिसांना लागली टीप, अन् मक्याच्या कणसांखाली सापडला सव्वा कोटींचा गांजा; ट्रकचा चालक फरार

राज्य मंत्रिमंडळातील युवा नेत्याला प्रसार माध्यमांचा वापर करून बदनाम करण्याचा कट केला जात आहे. त्यांची राजकीय कारकीर्द उध्वस्त करण्याचा हा भाजप चा कट आहे.  तपासासाठी येथे आलेले बिहारचे पोलीस भाजप नेत्यांच्या बीएमडब्ल्यू व जग्वार गाडीतून फिरले होते. याचा अर्थ हे कटकारस्थान सुरू आहे व कुणालातरी गोवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. हा सर्व कट निषेधार्ह आहे, असे सांगून ते म्हणाले की बिहार निवडणुकीसाठी भाजपने तयार केलेला हा अजेंडा आहे.

भंगारातून मिळाले मिळाले तब्बल 'इतक्या' कोटींचे उत्पन्न; पश्चिम रेल्वेकडून भंगाराचा ई-लिलाव...

कालपर्यंत भाजपच सत्तेवर असताना हेच पोलीस त्यांच्या ताब्यात होते आता याच पोलिसांवर भाजपनेते आरोप करत आहेत हे निंदनीय आहे. मात्र आमचा मुंबई पोलिसांवर विश्‍वास असून त्यांच्याच नेतृत्वाखाली हा तपास व्हावा अशी आमची मागणी असल्याचेही सावंत म्हणाले.

-------------------------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bihar police, who came to Mumbai, rode in the car of BJP office bearers; Shiv Sena MPs allegation

टॉपिकस