घर सोडून गेलेल्या बायकोला शोधण्यासाठी चक्क बाईकची चोरी! पोलिसांची माथेफिरूला अटक

सकाळ वृत्तसेवा 
Tuesday, 15 December 2020

वसईतील एका तरुणाला कौटुंबिक कलहामुळे त्याची बायको सोडून गेली होती. या पठ्याने त्याच्या बायकोला शोधण्यासाठी चक्क गाड्यांची चोरी केली. ही बाब पोलीस तपासात उघड झाली आहे. 

मुंबई - वसईतील एका तरुणाला कौटुंबिक कलहामुळे त्याची बायको सोडून गेली होती. या पठ्याने त्याच्या बायकोला शोधण्यासाठी चक्क गाड्यांची चोरी केली. ही बाब पोलीस तपासात उघड झाली आहे. 

मुंबई , वसई विरार परिसरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

वसईतील लहू राठोड हा तरुण आपल्या निघून गेलेल्या बायकोला शोधण्यासाठी रस्त्यावर लावलेल्या बाईक चोरायचा. बायको मिळाली की चोरलेली बाईक आहे तिथेच ठेऊन निघून जात असे. बाईक मधले पेट्रोल संपले तरीही बाईक तेथेच सोडून देत असे. दुकानदारांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या चोरट्याचा पराक्रम कैद झाला.  17 ऑक्टोबर रोजी प्रणेश वर्तक यांची बाईक वसईतील एका शॉपिंग सेंटर समोरुन चोरीला गेलेली. वर्तक यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलीसांनी नियोजित सापळा रचून त्याला अटक केली. 

मुंबईतील कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडा नियंत्रणात

मजूरी काम करणारा राठोडला बाईक डायरेक्ट चालू करण्याची शक्कल माहित होती. कौटुंबिक कलहामुळे तो वैतागला होता. त्यामुळे बायकोसोबत नेहमी भांडण होत असे. त्यामुळे बायको त्याला सोडून निघून जात असे. ती घरातून निघून गेल्यावर हा पठ्ठ्या तिला शोधण्यासाठी रस्त्यावरच्या बाईक चोरत असे. आणि बायको सापडली किंवा पेट्रोल संपले की, बाईक तेथेच टाकून देत असे. पोलीसांनी या माथेफिरू चोराला सध्या अटक केली आहे.

 

------------------------------------------------------------

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bike stolen to find wife who left home Police arrest in vasai virar