Crime : बड्डे पार्टी भोवली! बिल देण्यावरून झाला वाद; जिगरी मित्रांनीच बड्डे बॉयचा भोसकून केला खून

Crime News
Crime Newsesakal

मुंबई : बर्थडे पार्टी केली पण बील देण्यावरून मित्रांमित्रांमध्ये वाद झाला आणि त्यातून वाढदिवस असलेल्या तरूणाचाच भोसकून खून करण्याच आल्याची घटना घडली आहे. ही घटना मुंबईतील गोवंडी परिसरातील बैगनवाडी येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींनी अटक केली असून दोघांचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सबीर अन्सारी (वय २०) असं मत तरूणाचे नाव असून त्याने ३१ मे रोजी मध्यरात्री आपल्या वाढदिवसाच्या पार्टीचे आयोजन केले होते. इटेरी ढाबा येथे त्याने आणि त्याच्या ४ मित्रांनी या ढाब्यावर पार्टी केली. पार्टी झाल्यानंतर १० हजार रूपयांचे बील आले. पण बील भरण्यावरून त्यांच्यामध्ये वाद झाला. तू आता बील भर आम्ही तुला घरी गेल्यावर पैसे देऊ असं सबीरला त्याच्या मित्रांनी सांगितलं आणि ते घरी आले.

Crime News
Viral Video : वयाच्या 95 व्या वर्षीसुद्धा जगण्याची धडपड; आजोबा ताशा वाजवून भरतायेत पोट

दुसऱ्या दिवशी दुपारी सबीरने त्याचा मित्र असलेल्या शाहरूख आणि त्याच्या तीन मित्रांकडे पैशांची मागणी केली पण त्यांनी त्याला धमकी दिली. सबीर परत आला आणि त्याच्या मित्राला ही घटना सांगितली.

त्याच दिवशी रात्री ८ च्या सुमारास सबीर हा त्याच्या दुसऱ्या मित्रांसोबत शिवाजीनगर परिसरात वाढदिवस साजरा करत होता. यावेळी आरोपी घटनास्थळी पोहोचले आणि त्याला मारहाण करू लागले. त्यांनी टोकदार हत्याराने भोसकून तिथून पळ काढला. या हल्ल्यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता.

Crime News
Viral Video : बँकेत आधार लिंक करायला उशीर, महिलेच्या अंगात आली देवी; सरकारला दिला शाप

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली सबीरला हॉस्पिटलमध्ये दाखल केले पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिकचा तपास सुरू असल्याचं सांगितलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com