'हिंदुत्व समजून घेण्याची ठाकरेंची बौद्धिक कुवत नाही'; भाजप अध्यात्मिक आघाडीची टीका

तुषार सोनवणे
Wednesday, 28 October 2020

राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी भाजप अध्यात्मिक आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला असून, येत्या 1 नोव्हेंबर पर्यंत मंदिरं खुली करावीत अन्यथा मंंदिरांचे टाळे तोडू अशा इशार त्यांनी ठाकरे सरकारला दिला आहे. 

मुंबई - राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी भाजप अध्यात्मिक आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला असून, येत्या 1 नोव्हेंबर पर्यंत मंदिरं खुली करावीत अन्यथा मंंदिरांचे टाळे तोडू अशा इशार त्यांनी ठाकरे सरकारला दिला आहे. 

कोरोना संसर्गामुळे राज्यातील मंदिरे बंद करण्यात आली होती. आता लॉकडाऊन हळुहळु शिथिल होत असताना, मंदिरे मात्र बंद आहेत. मंदिरांवर अनेक कुटूंबांचे अर्थकारण अवलंबून असते. त्यांची गेल्या 7 महिण्यांपासून उपासमार सुरू आहे. त्यांना सरकारने कोणतीही आर्थिक मदत दिलेली नाही. म्हणून मंदिरे खुली करावीत या मागणीसाठी भाजप अध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांनी मुख्यमंत्र्यांना दोनदा भेटीसाठी वेळ मागितली होती. परंतु मुख्यमंत्री वेळ देत नाहीत म्हणून त्यांनी आज राजभवनावर जाऊन मंदिरे उघडण्याची मागणी राज्यपालांकडे केली.

हेही वाचा - ठाणे जिल्ह्यातील 38 हजार हेक्टरवरील भात शेतीचे नुकसान

राज्यातील मंदिरे आणि इतर सर्व धर्मिय प्रार्थना स्थळे खुली करावीत. अशी मागणी करणारे भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांनी खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना आघाडी सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर जहरी टीका केली. ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना आतापर्यंत 2-3 वेळा भेटीसाठी विनंती करण्यात आली. परंतु मुख्यमंत्री राज्यातील साधु संतांना, आचार्यांना भेटायलासुद्धा तयार नाही. मुख्यमंत्री असंवेदनशील आहेत. म्हणून आज राज्यपालांना भेटून याबाबत मागणी आम्ही केली. 

केंद्र सरकारने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांमध्ये मंदिरे खुली करण्याचे सांगितले आहे. स्वतःला वैद्यकिय क्षेत्रातील जाण आहे असे माननारे मुख्यमंत्री बियर बार , रेस्टॉरंट सुरू करतात. तेथे लोकांना कोरोना होत नाही. आणि मंदिरांमध्ये मात्र कोरोना कसा होऊ शकतो. असा सवाल भोसले यांनी केला. तसेच, ज्या कुटूंबांचे अर्थकारण मंदिरांवर अवलंबून आहे. त्यांची उपासमार होत असून, त्यांची उपासमार दूर करण्यासाठी तत्काळ मंदिरे खुली करणे गरजेचे आहे. असेही भोसले यावेळी म्हणाले.

हेही वाचा - तुला थोबडवणार...मराठीची चिड येते म्हणणाऱ्या कुमार सानूच्या मुलाला मनसेचा इशारा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात, हिंदु धर्म म्हणजे थाळ्या आणि घंटे बडवणे नाही, तसेच सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हिंदुत्वाच्या व्याख्येचा दाखला दिला होता. त्यावरून भोसले यांनी सडकून टीका करत म्हटले की, मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वाची व्याख्याच माहित नाही.  सरसंघचालकांचे बौधिक समजुन घेण्यासाठी बौधिक कुवत असावी लागते. ती कुवत नसलेल्या व्यक्तीने त्यांना भाषण लिहून दिले आहेत.त्यामुळे त्यांनी त्याचा विपर्यास केला .

भोसलेंच्या या भूमिकेवर मुंबईच्या महापौर किशाोरी पेडणेकर यांनी उत्तर देतांना म्हटले की, मंदिरांचे टाळे तोडायला मोगलाई लागून गेली आहे का? त्यामुळे मंदिरे खुली करण्याच्या मुद्यावरून शिवसेना भाजप आमने सामने आल्याचे दिसून येत आहे.

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP adhyatmik aghadi criticized on cm uddhav thackeray