

BMC Election Banner of UBT And MNS
ESakal
ठाणे : मराठी अस्मितेचे रक्षक असल्याचा दावा करणाऱ्या मनसे आणि ठाकरे गटाने ठाण्यात चक्क इंग्रजी भाषेतून प्रचाराचे बॅनर लावल्याने नवा वाद उफाळून आला आहे. यावरून भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी या दोन्ही पक्षांवर टीका केली असून, सत्तेसाठी भाषा आणि तत्त्वे बदलण्याची सवय लागली आहे, असा टोला लगावला आहे.