

Vote Theft
ESakal
डोंबिवली : आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात भाजपा आणि शिवसेना शिंदे गटात जोरदार रस्सीखेच सुरू झाली असून कार्यकर्त्यांच्या पळवा पळवी सोबतच आता प्रभागातील याद्यातून मतदार खेचाखेची देखील सुरु झाल्याचे पहायला मिळत आहे. त्यातच दिवा शहरात मतदार यादीत 17 हजाराहून अधिक दुबार मतदार असल्याची बाब सत्ताधारी भाजपा आणि शिवसेना ठाकरे गटाने उघड केल्याने एकच खळबळ माजली आहे. दरम्यान याबाबत भाजपा, मनसे, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यासंदर्भात निवडणूक आयोग अधिकाऱ्यांची एकत्रित भेट घेणार असून याबाबत पत्रही देणार आहेत. यामुळे दिव्यातील राजकारण एक वेगळेच वळण लागण्याची चर्चा आत्ताच रंगू लागली आहे.