
विरार : वसई विरार महानगरपालिकेची निवडणूक महापालिकेच्या स्थापनेनंतर प्रथमच चुरशीची होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. विधानसभेच्या निवडणुकीनंतर येथील राजकीय गणिते बदलली आहेत. यापूर्वी वसई तालुक्यातील तीनही मतदार संघात बहुजनचे आमदार होते. परंतु यावेळी तीनही जागा ह्या विरोधकांकडे गेल्याने ही निवडणूक बहुजनची परीक्षा घेणारी ठरणार आहे.