esakal | 'तेव्हापासून ज्वलंत हिंदुत्व खुंटीला टांगलंय'; शिवसेनेवर टीका
sakal

बोलून बातमी शोधा

'तेव्हापासून ज्वलंत हिंदुत्व खुंटीला टांगलंय'; शिवसेनेवर टीका

'तेव्हापासून ज्वलंत हिंदुत्व खुंटीला टांगलंय'; शिवसेनेवर टीका

sakal_logo
By
विराज भागवत

नामकरणाचा नवा वाद; भाजपचे उपाध्ये, भातखळकर आक्रमक

मुंबई: नवी मुंबई विमानतळाला (Navi Mumbai International Airport) बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचं नाव द्यायचं की दि बा पाटील (Di Ba Patil) यांचं नाव द्यायचं या मुद्द्यावरून गेले काही दिवस वाद (Debate) सुरू आहे. शिवसेना (Shivsena) विरूद्ध नवी मुंबई (Navi Mumbai), रायगडमधील (Raigad) भूमिपुत्र असा उभा संघर्ष सुरू आहे. हा नामकरणाचा वाद पेटला असतानाच आता एक नव्या वादाने तोंड काढलं आहे. घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर छेडानगर ते मानखुर्दपर्यंत होत असलेल्या पुलाच्या (Mankhurd Flyover) नावावरून आता वाद निर्माण झाला असून त्यावरून भाजपने पुन्हा एकदा शिवसेनेला हिंदुत्त्वाच्या (Hindutva) मुद्द्यावर लक्ष्य केले आहे. (BJP Atul Bhatkhalkar Keshav Upadhye slams Uddhav Thackeray Shivsena Rahul Shewale over Hindutva Mankhurd Flyover Issue)

हेही वाचा: नाशिकनंतर आता उल्हासनगरमध्येही 'मॅग्नेट मॅन'; फोटो व्हायरल

मानखुर्द फ्लायओव्हरच्या हा एकूण २.९ किमी लांबीचा आहे. हा पूल लवकरच वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. या उड्डाणपुलास सुफी संत सुल्तानुल हिंद ख्वाजा गरीब नवाज (मोईनुदिन सुफी चिश्ती-अजमेरी) यांचे नावे देण्यात यावे, अशी मागणी संस्थांकडून करण्यात आली आहे. या मागणीला समर्थन देणारे निवेदन शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे. छेडानगर ते मानखुर्द या परिसरात सुमारे ७० टक्के लोकसंख्या ही मुस्लिमधर्मीयांची असल्याने आपण या उड्डाणपुलास ख्वाजा गरीब नवाज यांचे नाव देऊन या समाजाच्या भावनांचा सन्मान करावा, अशी आग्रही विनंती शेवाळे यांनी पत्राद्वारे केली आहे.

हेही वाचा: भाजपच्या प्रवीण दरेकर यांचा राज्य सरकारला इशारा, म्हणाले...

विश्व हिंदू परिषदेच्या चेंबूर जिल्हा पदाधिकाऱ्यांनी या पुलाचे नाव लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने ठेवावे असं निवेदन मुख्यमंत्र्यांना दिलं आहे. हे निवेदन शेवाळे यांच्या पत्रानंतर दोनच दिवसांनी देण्यात आले आहे. त्यामुळे यावरून वाद रंगणार हे नक्की आहेच. पण या मुद्द्यावरून भाजपचे आमदार अतुल भातखळकर आणि प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

हेही वाचा: मुंबईचा Positivity रेट 2.5 टक्क्यांवर पण 'ही' आहे चिंतेची बाब

"जय भवानी, जय शिवाजी'पासून सुरू झालेला प्रवास जेव्हा हजरत टिपू सुलतान की जय... पर्यंत येतो तेव्हा अशा पत्रांचे आश्चर्य वाटत नाही. काँग्रेस,असदुद्दीन ओवेसीच्या मतपेढीला शिवसेनेने तीव्र स्पर्धा निर्माण केली आहे. सोनिया मातोश्रींच्या चरणी गेल्यापासून ज्वलंत हिंदुत्व खुंटीला टांगलय", अशी टीका भातखळकर यांनी केली आहे.

तर, "शिवसेनेने हिंदुत्व सोडले,मराठीबाणा सोडला, आता सर्वसामान्य मुंबईकरांचा आवाज ही सोडला. अण्णाभाऊ साठे म्हणजे सर्वसामान्यांचा कष्टकऱ्यांचा आवाज. मानखुर्दच्या उड्डाण पूलास त्यांच नाव देण योग्य असताना ख्वाजा गरीब नवाजचे नाव पुलाला देण्याची शिवसेना खासदाराची सूचना", अशा शब्दात उपाध्ये यांनी शिवसेनेला लक्ष्य केले.

आता, या साऱ्या गोंधळात हा नामकरणाचा वाद किती चिघळतो याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

हेही वाचा: मुंबईत 733 नवे रूग्ण तर 732 जणांची कोरोनावर मात

loading image
go to top