माणुसकी खड्ड्यात... भाजप आमदाराचा संताप; ठाकरे सरकारवर टीका

माणुसकी खड्ड्यात... भाजप आमदाराचा संताप; ठाकरे सरकारवर टीका "कुरघोडीच्या राजकारणात त्यांनी माणुसकीचा मात्र बळी दिला" BJP Atul Bhatkhalkar slams Shivsena NCP fight over Tata Cancer Hospital decision
uddhav-thackeray-sad
uddhav-thackeray-sad

"कुरघोडीच्या राजकारणात त्यांनी माणुसकीचा मात्र बळी दिला"

मुंबई: शहरातील टाटा रूग्णालयात अनेक लोक दररोज उपचारासाठी येतात. केवळ मुंबईतूनच नव्हे तर मुंबईबाहेरूनही काही लोक आपल्या रूग्णाला उपचारासाठी येथे आणतात. त्या रूग्णावर उपचार होईपर्यंत काही दिवस त्यांच्या नातेवाईकांना मुंबईतच कुठेतरी आसरा शोधावा लागतो. या साऱ्याचा विचार करून राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी टाटा कॅन्सर रुग्णालयाला ‘म्हाडा’च्या १०० सदनिका देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते टाटा रूग्णालयाचे प्रमुख डॉक्टर यांना चाव्याही सुपूर्द करण्यात आल्या होत्या. पण शिवसेनेच्या स्थानिक आमदार व खासदारांनी यास विरोध दर्शवल्यानंतर या निर्णयाला स्थगिती देण्यात आली. या मुद्द्यावरून वातावरण काहीसं पेटलं असतानाच भाजप आमदार अतुल भातखळकर यांनीही या प्रकरणावर टीकास्त्र सोडलं. (BJP Atul Bhatkhalkar slams Shivsena NCP fight over Tata Cancer Hospital decision)

uddhav-thackeray-sad
"कॅन्सरग्रस्तांच्या प्रश्नावर राजकारण व्हायला नको होते"

"गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी टाटा कॅन्सर हॉस्पिटलमधील रुग्णांच्या निवाऱ्यासाठी जवळच्या सुखकर्ता-विघ्नहर्ता सोसायटीत काही घरे देण्याचा निर्णय शरद पवार यांच्या उपस्थितीत जाहीर केला होता. परंतु सहीच्या एका फटकाऱ्यासह मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय रद्द केला. माणुसकी खड्ड्यात..!! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या निर्णयाला महावसुली सरकारमधील सत्ता संघर्षाची किनार आहेत. आपणच बॉस असून पवारांना फाट्यावर मारतो हे मुख्यमंत्र्यांनी दाखवून दिले. परंतु कुरघोडीच्या राजकारणात त्यांनी माणुसकीचा मात्र बळी दिला. राजकारणाने नीच पातळी गाठली आहे", अशा शब्दात अतुल भातखळकर यांनी याबाबत संताप व्यक्त केला.

uddhav-thackeray-sad
अत्यंत दुर्दैवी घटना आणि संतापजनक सारे -आशिष शेलार
uddhav-thackeray-sad
मुंबईत कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी तब्बल 722 दिवसांवर

"कर्करोगाने ग्रस्त असलेल्या रूग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मुंबईत उपचारासाठी आल्यानंतर आतापर्यंत फुटपाथवर झोपावे लागत होते. पावसाळ्यात तर विविध ठिकाणी आसरा शोधावा लागत होता. त्यांचे अतिशय हाल होत होते हे पाहिल्यानंतरच जितेंद्र आव्हाड यांनी म्हाडातील १०० फ्लॅट्स टाटा रूग्णालयाला देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे रूग्णांच्या नातेवाईकांना खूपच दिलासा मिळाला होता. पण आता या निर्णयाला स्थगिती देण्यात आल्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना पुन्हा मरणयातना सहन कराव्या लागणार आहेत. कॅन्सरग्रस्तांच्या प्रश्नामध्ये राजकारण व्हायला नको होते", अशी खंत सामाजिक कार्यकर्ते सुनील ओझा यांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com