

BJP Finalises Candidates For Mumbai Civic Polls
Esakal
मुंबई महानगर पालिका निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलीय. यात भाजपने युवा मोर्चा अध्यक्ष्य तेजिंदर सिंग तिवाना यांना मुंबईत वॉर्ड क्रमांक ४७ मधून उमेदवारी दिलीय. याशिवाय शिवानंद शेट्टी, जितेंद्र पटेल यांनाही तिकीट देण्यात आलंय. भाजपचे माध्यमप्रमुख नवनाथ बन हेसुद्धा निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. त्यांच्यासोबत भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या यांना वॉर्ड क्रमांक १०७ मधून तिकीट देण्यात आलं आहेय.