हिवाळी अधिवेशनाआधी भाजपचा चहापानावर बहिष्कार; महाविकास आघाडीवरही टीका

हिवाळी अधिवेशनाआधी भाजपचा चहापानावर बहिष्कार; महाविकास आघाडीवरही टीका

मुंंबई - राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन यावर्षी नागपूर ऐवजी मुंबईत होत आहे. हे अधिवेशन दोनच दिवस म्हणजेच सोमवारी आणि मंगळवारी होणार आहे. सत्ताधारी पक्षाने आयोजित केलेल्या सर्वपक्षीय चहापानावर भारतीय जनता पक्षाने बहिष्कार टाकला आहे. 

विधिमंडळाचे यंदाचे हिवाळी अधिवेशन मुंबईतच होणार आहे. या अधिवेशनासाठी महाविकास आघाडीकडून रविवारी सायंकाळी सह्याद्री अतिथी गृहावर चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमावर विरोधी पक्ष भाजपने बहिष्कार टाकला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस त्याआधी पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. राज्यातील कोरोनाची स्थिती हाताळण्यास महाविकासआघाडी सरकारचे अपयश, ओला दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांना न मिळालेली मदत इत्यादी मुद्द्यावरून भाजपने चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे.

भाजपने दोन दिवसांच्या हिवाळी अधिवेशनाच्या मुद्द्यावरही सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर  नागपूर येथे होणारे हिवाळी अधिवेशन मुंबई येथे घेण्यात येणार आहे.

BJP boycotts tea before winter session of maharashtra legislative assymby

-----------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com