esakal | भाजपने फोडली प्रतीकात्मक हंडी !
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

भाजपने फोडली प्रतीकात्मक हंडी !

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

दिवा : कोरोनाचे (Corona) सावट अजूनही कायम असल्याने राज्य सरकारचे सार्वजनिक दहीहंडी उत्सवावर निर्बंध लादले; पण हे निर्बंध हिंदू (Hindu) सणाच्या वेळेसच राज्य सरकारला (State Goverment) का आठवतात, असा सवाल करून दिव्यातील भाजपा (BJP) युवा मोर्चातर्फे महाआघाडी सरकारच्या विरोधात घोषणा देत प्रतीकात्मक दहीहंडी (Dahi Handi) फोडण्यात आली.

ठाकरे सरकार हाय हाय, बोल बजरंग बली की जय, जय श्री राम, ठाकरे सरकारचा निषेध असो अशा घोषणा देत आज भाजप युवा मोर्चा अध्यक्ष सचिन रमेश भोईर, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष नीलेश पाटील, भाजप दिवा मंडल अध्यक्ष आदेश भगत, रोशन भगत, युवराज यादव, समीर चव्हाण, वीरेंद्र गुप्ता, नीलेश भोईर आणि भाजपच्या दिव्यातील कार्यकर्त्यांनी ठाकरे सरकारचा निषेध करत प्रतीकात्मक दहीहंडी फोडली.

हेही वाचा: सर्वांनी जबाबदारीने वागा : उदयनराजे

त्यावेळी सर्वांनी डोक्याला, हाताला काळ्या रिबिनी बांधून निषेधाचे फलक लावून दहीहंडी फोडली.

loading image
go to top