esakal | मोठी बातमी : राष्ट्रपती राजवटीच्या मागणीवर भाजपकडून भूमिका जाहीर 
sakal

बोलून बातमी शोधा

मोठी बातमी : राष्ट्रपती राजवटीच्या मागणीवर भाजपकडून भूमिका जाहीर 

महाराष्ट्रातल्या राजकारणात चांगलंच ढवळून निघाल्याचं चित्र आहे.

मोठी बातमी : राष्ट्रपती राजवटीच्या मागणीवर भाजपकडून भूमिका जाहीर 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई-  महाराष्ट्रातल्या राजकारणात चांगलंच ढवळून निघाल्याचं चित्र आहे. सोमवारी भाजप खासदार नारायण राणे यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान राणेंनी ठाकरे सरकार कोरोना संकट हाताळू शकत नाही. या सरकारची क्षमता नाही. हे सरकार कोरोनाचा सामना करण्यास अपयशी ठरलं असून या सरकारला नारळ देऊन राष्ट्रपती राजवट आणावी, अशी मागणी केली. त्यावर आता राणे यांना त्यांचाच पक्ष भाजपनं झटका दिला आहे. राणेंनी राज्यपालांकडे केलेली राष्ट्रपती राजवटीची मागणी ही भाजपची अधिकृत भूमिका किंवा मागणी नसल्याचं भाजपनं स्पष्ट केलं आहे.

मोठी बातमी - महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागणार का ? संजय राऊत म्हणतात...

नारायण राणेंची राष्ट्रपती राजवटीची मागणी ही पक्षाची अधिकृत भूमिका नाही. तशी मागणी भाजपने केलेली नाही. ती राणेंची वैयक्तिक मागणी असल्याचं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. 

भेटीदरम्यान काय म्हणाले होते नारायण राणे

सध्या राज्यातली कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा आणि मृतांचा वाढत आहेत. राज्यपालांनी याकडे गांभीर्याने पाहावं आणि राज्यात होणारे मृत्यू थांबवून त्या दृष्टीनं प्रयत्न करावेत.  मनपा आणि राज्य सरकारच्या रुग्णालयांची अवस्था वाईट असल्यानं अनेक रुग्णांना रुग्णालयात दाखल न केल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा परिस्थितीत सरकारचं लक्ष नाही असं म्हणणार नाही, त्यांचं हे काम नाही. राज्यात कोरोनासारखी परिस्थिती हे सरकार हाताळू शकत नसल्याचं राणे म्हणाले होते.

हे सरकार उपाययोजना करु शकत नाही, प्राण वाचवू शकत नाही. या सरकारची कोरोना सारख्या व्हायरसचा सामना करण्याची क्षमता नाही, त्यामुळे यांना नारळ द्यावा आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी राणे यांनी राज्यपालांकडे केली होती. 

मोठी बातमी -  महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागणार का ? संजय राऊत म्हणतात...

शिवसेनेचा राणेंवर पलटवार 

राष्ट्रपती राजवट लावायची असेल तर गुजरातमधून सुरुवात झाली पाहिजे. गुजरातमधील उच्च न्यायालयाने कोरोना हाताळण्यासंबंधी निष्कर्ष काढला आहे ते गंभीर आहे. गुजरातमध्ये सरकारी रुग्णालये स्मशाने झालेत, अंधार कोठड्या झाली आहेत असे गुजरात हायकोर्टाने सरकारवर ताशेरे ओढलेत. तिथल्या राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना बोलावून समज द्यायला हवी होती आणि विरोधकांनीही मुख्यमंत्र्यांना जाब विचारला पाहिजे, असं संजय राऊत यांनी म्हटलंय.

महाराष्ट्राचं सरकार, ठाकरे सरकार... राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि इतर प्रमुख पक्ष यांच्या महाविकास आघाडीचं बनलं आहे. हे सरकार संपूर्ण 5 वर्षांचा कालावधी पूर्ण करणार असून पुढील निवडणुकाही आम्ही एकत्रच लढणार असल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.

bjp clears their stand about narayan ranes demand of implementing presidential rule in maharashtra


 

loading image