महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागणार का ? संजय राऊत म्हणतात...

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागणार का ? संजय राऊत म्हणतात...

मुंबई काल शरद पवार यांनी राज्यपालांची घेतलेली भेट. त्यानंतर शरद पवार यांनी मातोश्रीवर लावलेली हजेरी. यानंतर महाराष्ट्रात राजकीय चर्चाना उधाण आलं. मातोश्रीवर शरद पवार गेल्याची माहिती स्वतः शिवसेनेचे फायरब्रॅन्ड नेते संजय राऊत यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली. अशात महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागणार का ? महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप येणार का ? अशा चर्चा पुढे येतायत. यावर स्वतः संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

सध्या कोरोनाचा काळ असल्याने सर्वजण क्वारंटाईन आहेत. त्यामुळे राजकारण देखील क्वारंटाईन आहे. अशात विरोधकांनी देखील क्वारंटाईन व्हावं असा सल्ला संजय राऊतांनी दिला. कोरोनाच्या काळात विरोधकांना कोरोनाच्या संवेदनशील काळात राजकारण करावं वाटतं असेल तर त्यांना शुभेच्छा. महाराष्ट्रातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि महत्त्वाच्या पक्षांचं महाविकास आघाडीचं सरकार हे पूर्ण पाच वर्ष कार्यकाळ पार पाडेल असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केलाय. 

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर कुणालाही भुवया उंचावण्याची गरज नाही. कारण शरद पवार यांचं मत घेतलं सार्वजणांकडून जातं. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील शरद पवारांशी चर्चा करत असतात. अनेक राज्याचे मुख्यमंत्री शरद पवारांशी चर्चा करत असतात. अशात शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली तर त्यात एवढा गदारोळ होण्याचं कारण नाही.  

आमच्याकडे १७७ आमदारांचं बहुमत आहे. यामध्ये शरद पवारांचं मोठं श्रेय आहे. कोरोनामुळे राज्य संकटात असतात सर्वांनी एकत्र येऊन या संकटाशी लढणं महत्त्वाचं आहे. इतर राज्यात सर्व विरोधक तसं करताना पाहायला मिळतायत. महाराष्ट्रात तसं व्हावं अशी इच्छा राऊतांनी बोलून दाखवली.शरद पवार हे सर्वांसाठी मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहे हे सांगण्यास संजय राऊत विसरले नाहीत. सरकारची एकही चिरा ढळली जाणार नाही असंही ते म्हणालेत.  

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागणार का ? 

महाराष्ट्रात कोरोना संदर्भात कामं होत नाही, असं जर विरोधक म्हणत असतील आणि या पार्श्वभूमीवर ते राष्ट्रपती राजवटीची मागणी करत असतील तर सर्वात जास्त कठीण परिस्थिती गुजरातध्ये आहे. गुजरातबद्दल कोर्टाने गंभीर निरीक्षण नोंदवलं आहे. तिथून राष्ट्रपती राजवट लावण्यास सुरवात करावी. असंही संजय राऊत म्हणालेत. 

will presidential rule implemented in maharashtra sanajay raut says first implement it in gujrat
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com